सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तेव्हा मी वर्षानुवर्षे टिकून राहिली”, कपिल शर्माबरोबरच्या कामाबद्दल सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “नाव, प्रसिद्धी आणि पैसा…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 4, 2025 | 11:00 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sumona Chakravarti on working with Kapil Sharma

अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीने शेअर केला कपिल शर्मा शोमध्ये काम करण्याबद्दलचा अनुभव

टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती. वयाच्या ११व्या वर्षी अभिनेत्रीने आमीर खान आणि मनीषा कोइरालाच्या ‘मन’ चित्रपटातून इंडस्ट्रीत एन्ट्री केली होती. त्यानंतर तिने काही चित्रपटांत काम केलं. रणबीर कपूरबरोबर ‘बर्फी’, सलमान खानबरोबर ‘किक’मध्ये तिने भूमिका साकारली. पण चित्रपटांत तिला फारसं यश मिळालं नाही आणि तिने टेलिव्हिजनमध्ये एन्ट्री केली आणि तुफान लोकप्रियता मिळवली. अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती गेल्या काही काळापासून प्रसिद्धीपासून दूर आहे. ती शेवटची ‘खतरों के खिलाडी’ मध्ये दिसली होती. तथापि, सुमोना अलीकडेच एका पॉडकास्टवर दिसली जिथे तिने कपिल शर्माबरोबर काम करण्याबद्दल सांगितले. (Sumona Chakravarti on working with Kapil Sharma)

अभिनेत्रीने तिच्या कारकिर्दीची सुरुवात कशी केली आणि कपिलबरोबर कोणताही जोडीदार नसताना तिने ‘कॉमेडी सर्कस’मध्ये कपिल शर्माबरोबर कसे काम केले हेदेखील सांगितलं. सुमोनाने ‘द कपिल शर्मा शो’ मधील तिच्या प्रवासादरम्यान पाहिलेल्या चांगल्या आणि वाईट गोष्टींची आठवणही केली. अभिनेत्री तिच्या प्रवासाबद्दल बोलताना म्हणाली की, “‘द कपिल शर्मा शो’ने मला खूप नाव, प्रसिद्धी आणि पैसा दिला. मी २० वर्षांपासून अभिनेत्री म्हणून काम करत आहे. कलाकारांचे आयुष्य खूप कठीण असते. कारण त्याला अनेक परिस्थितींना तोंड द्यावे लागते”.

View this post on Instagram

A post shared by Sumona Chakravarti (@sumonachakravarti)

आणखी वाचा – गुगलवर आराध्याबद्दल चुकीची माहिती, अभिषेक-ऐश्वर्या बच्चन यांची उच्च न्यायालयात धाव, नेमकं प्रकरण काय?

यापुढे सुमोना म्हणाली की, “तुम्ही ज्या प्रकल्पावर पैसे कमावता ते तुम्ही काम करत असलेल्या वेळेसाठी असतात. कारण तुम्हाला माहित नसते की, ते काम किती काळ चालणार आहे”. पुढे सुमोना असं म्हणाली की, “नंतर मला ‘कॉमेडी सर्कस’मध्ये कपिलची साथीदार होण्यासाठी संपर्क साधण्यात आला. मी तो शो पाहिला नव्हता, मी शोमध्ये काम केले. पण कॉमेडी नव्हती केली. मग मी विचार केला की, मी ते करुन पाहीन आणि कपिल बरोबर एक सीझन केला आणि ही जोडी हिट ठरली”.

आणखी वाचा – मुंबईच्या रस्त्यांवर फिरणारा आदीमानव आमीर खान नाही, अभिनेत्याच्या टीमकडून खुलासा, मग ती व्यक्ती कोण?

यानंतर सुमोना म्हणाली की, “अर्चना पूरण सिंग आणि सोहेल खान यांनी मला त्यावेळी सांगितले होते की, कपिलच्या साथीदारांनी मध्येच त्याची साथ सोडली किंवा त्यांना बाहेर काढले गेले, कोणीही टिकून राहिले नाही. मी पहिली होती जी तिथे वर्षानुवर्षे टिकून राहिली. ‘द कपिल शर्मा शो’साठी, दुसऱ्या कोणासोबत मॉकशूट केले होते, पण नंतर त्यांनी मला शोमध्ये आणण्यास सांगितले. त्यामुळे राम कपूरची बहीण असण्यापासून, मी कपिल शर्माची पत्नी झाले”.

Tags: kapil sharmasumona chakravarti comedySumona Chakravarti on working with Kapil Sharma
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
Bandhu Marathi Movie
Entertainment

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
Next Post
Samay Raina asked Amitabh about Rekha in Kaun Banega Crorepati show

Video : KBCमध्ये समय रैनाने अमिताभ बच्चन यांना थेट रेखा यांच्या नावावरुन डिवचलं, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.