शर्यतीच्या जगात टिकाव लागण्यासाठी गरज असते उत्कृष्ट कामगिरीची. आपल्या उत्कृष्ठ कामगिरीच्या जोरावर मराठी चित्रपट सृष्टीमध्ये नवीन रेकॉर्डस् मोडण्याचा विढा उचलला आहे तो केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने. सध्या बॉलीवूड, हॉलिवूडसह सर्वत्र अनेक चित्रपटांची रांग लागलेली दिसते अशातच मराठी चित्रपट सृष्टीला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस येताना पाहायला मिळत आहेत. मराठी चित्रपटांच्या यशात मोलाचा वाटा आहे तो म्हणजे ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाचा. वेड नंतर पहिल्या २४ दिवसात सर्वाधिक म्हणजेच तब्बल ६५ कोटी रुपयांची कमाई करणारा ‘बाईपण भारी देवा’ हा पहिला चित्रपट ठरला. तर आता पुन्हा एकदा वेडचा पहिल्या ३० दिवसाचा रेकॉर्ड मोडीत काढत बाईपण ने पहिल्या ३० दिवसात तब्बल ७० कोटी २० लाख रुपयांची कमाई केली आहे.(baipan bhari deva box collection)
या संदर्भात चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी पोस्ट करत लिहिलंय “आपण न मागता परमेश्वर भरभरून देतो.. तो नेमका कोणत्या रूपात प्रकट होतो? ते कधीच कळत नाही. यावेळी मात्र त्याचं रूप पाहिलं.. रसिक प्रेक्षकांच्या रूपातच परमेश्वर प्रत्येक चित्रपट गृहात अवतरला. आणि पदरात दान टाकून गेला.. अजून बराच पल्ला गाठायचा आहे. परमेश्वर साथ सोडणार नाहीच, याची खात्री आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री सिध्दीविनायक महाराज की जय.” केदार शिंदे यांच्या पोस्ट वर चाहत्यांनी “लवकरचं सैराटचा रेकॉर्ड मोडूदेत, मराठी चित्रपट १०० , ५०० कोटी रुपयांची कमाई करुदेत.आपली भारतीय पहिली मराठी चित्रपट सृष्टी आयत्या बिळातील नागोबा परक्या बॉलिवूडला पुरून पुन्हा मुंबईत स्वतःचे अस्तित्व निर्माण करूदे” , “लवकरच शंभरी पार कराल.. आधीच अभिनंदन करून ठेवते.” अशा अनेक कमेंट्स करत चित्रपटाचं आणि केदार शिंदे यांचं कौतुक केलं आहे.(kedar shinde)
सोबतच चित्रपटातील अन्य कलाकारांनी देखील पोस्टर पोस्ट करत आनंद व्यक्त केला आहे. बाईपण भारी देवा या चित्रपटाला केवळ महाराष्ट्रभरात नाही तर जगभरात प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला. चित्रपटातील ६ अभिनेत्री आणि त्यांचा अफलातून अभिनय शिवाय केदार शिंदे यांच्या उत्कृष्ट दिग्दर्शनामुळे चित्रपटाच्या यशाचा पाया रचला गेला.(baipan bhari deva)