रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वयाच्या ५९व्या साली आमिर खान प्रेमात?, कोण आहे ती मिस्ट्री गर्ल, कुटुंबासह भेटही घडवली अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 1, 2025 | 9:54 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Aamir Khan Love

वयाच्या ५९व्या साली आमिर खान प्रेमात?, कोण आहे ती मिस्ट्री गर्ल, कुटुंबासह भेटही घडवली अन्…

Aamir Khan Love : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा लोकप्रिय अभिनेत्यापैकी एक आहे आणि त्याला सुपरस्टार खानांपैकी एक मानले जाते. ९० च्या दशकात त्याचे आकर्षण इतके होते की, मुली त्याच्या सुंदर दिसण्यावर भाळायच्या आणि सलमानने एकदा मीडियाला सांगितले होते की मुलींमध्ये आमिरची प्रचंड क्रेझ आहे. आमिरची कारकीर्द उत्तम राहिली असली तरी त्याचे वैयक्तिक आयुष्य चढ-उतारांनी भरलेले आहे. त्याने दोनदा लग्न केले आहे, पण दोन्ही वेळा तो घटस्फोटामुळे चर्चेत राहिला. अशातच आता आमिर पुन्हा एकदा प्रेमात पडला असल्याची बातमी समोर आली आहे.

फिल्मफेअरच्या एका वृत्तानुसार, आमिर खानला त्याचे नवं प्रेम सापडले आहे. त्याच्या आयुष्यातील ती गूढ मुलगी बेंगळुरुची आहे. अभिनेत्याच्या जवळच्या एका सूत्राने ही माहिती दिली असल्याचं समोर आलं आहे. आमिर सध्या त्याच्या प्रेयसीबद्दल काहीही सांगू इच्छित नाही. तथापि, सूत्रांनी पुष्टी केली की आमिर त्याच्या या नव्या नात्याबद्दल गंभीर आहे कारण त्याने त्याच्या मैत्रिणीची त्याच्या संपूर्ण कुटुंबाशी ओळख करुन दिली आहे आणि ही भेटही सकारात्मक राहिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आमिरची नवीन साथीदार बंगळुरुची आहे. आपण त्यांच्या गोपनीयतेचा आदर केला पाहिजे आणि वैयक्तिक माहिती उघड करु नये. आमिरने अलीकडेच त्या महिलेची त्याच्या संपूर्ण कुटुंबाशी ओळख करुन दिली. आणि ही बैठक खूप चांगली झाली”.

आणखी वाचा – Video : सहा महिन्यांनी बहिणीच्या घरी पोहोचली खुशबू तावडे, विविध पदार्थ, खेळ अन् धमाल, व्हिडीओ व्हायरल

यापूर्वी, जेव्हा आमिरला त्याच्या तिसऱ्या लग्नाबद्दल आणि तो तिसऱ्यांदा लग्न करण्याचा विचार करत आहे का याबद्दल विचारण्यात आले होते, तेव्हा तो म्हणाला होता की, “मी आता ५९ वर्षांचा आहे, मी पुन्हा लग्न करेन याचा विचार करणे कठीण आहे. माझ्या आयुष्यात सध्या खूप नाती आहेत, मी माझ्या कुटुंबाशी, माझ्या मुलांशी पुन्हा जोडलो गेलो आहे. माझ्या जवळच्या लोकांबरोबर राहून मला खूप आनंद होतो. मी एक चांगला माणूस बनण्यासाठी काम करत आहे”.

आणखी वाचा – टॉपलेस फोटोशूट ते किन्नर आखाड्यातून मिळालेली पदवी ठरली वादग्रस्त, ममता कुलकर्णींचं वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं आयुष्य नक्की कसं?

आमिर खानचे पहिले लग्न १९८६ मध्ये रीना दत्ताबरोबर झाले होते आणि नंतर ते २००२ मध्ये वेगळे झाले, परंतु ते त्यांच्या दोन मुलांसाठी म्हणजेच आयरा आणि जुनैदसाठी एकत्र राहिले. नंतर आमिर खान आणि किरण राव एकमेकांच्या प्रेमात पडले. काही वर्षे डेटिंग केल्यानंतर, दोघांनी २००५ मध्ये लग्न केले. दोघांनाही एक मुलगा आहे. अकरा वर्षांच्या नात्यानंतर, आमिर आणि किरण यांनीही वेगळे होण्याची घोषणा केली.

Tags: aamir khanAamir Khan Lovebollywood news
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Laughter Chefs Season 2 Contestant

आलिशान घर, महागड्या कार अन्…; 'लाफ्टर शेफ'मधील 'हे' कलाकार जगतात असं आयुष्य, सगळं काही आहे खास

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.