शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

महाकुंभ मेळ्यामध्ये पोहोचले ‘रामायण’फेम अरुण गोविल, प्रसाद वाटप करत सगळ्यांचं वेधलं लक्ष, अभिनेत्याच्या साधेपणाची चर्चा

Shamal Sawantby Shamal Sawant
जानेवारी 28, 2025 | 5:56 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
arun govil at mahakumbh 2025

प्रयागराज येथे पोहोचले 'रामायण'फेम अरुण गोविल

रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. गेले अनेक वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या मालिकेतील सर्व पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. या मालिकेमध्ये रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांचा मोठा चाहतावर्ग आहे. राजकारणामध्येही ते सक्रिय आहेत. मात्र आता ते कोणत्याही मालिकेमुळे किंवा राजकीय मुद्दयामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. देशात सध्या महाकुंभ सुरु आहे. या महाकुंभ मेळ्यासाठी जगभरातून अनेक भाविक हजेरी लावत आहेत. अरुण यांनीदेखील या मेळ्यामध्ये सहभाग घेतला. यावेळचे त्यांचे फोटो व व्हिडीओदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत. (arun govil at mahakumbh 2025)

अरुण यांनी पवित्र त्रिवेणी संगम गंगा, यमुना व सरस्वतीमध्ये डुबकी मारली. अनुष्ठान स्नान केल्यानंतर त्यांनी शुभेच्छा देत लिहिले की, “आई गंगा, आई यमुना व आई सरस्वती सर्वांचा आशीर्वाद मिळूदे”. तसेच त्यांनी अजून लिहिले की, “मला प्रयागराजमध्ये पवित्र त्रिवेणी संगममध्ये पवित्र स्नान करण्याचे सौभाग्य मिळाले. आस्था, एकता समानता व सर्वात मोठा आध्यात्मिक सोहळ्याचे प्रतीक असलेला महाकुंभ २०२५ सनातन संस्कृतीचे हे एक महापर्व आहे. हे आपल्या देशाचे समृद्ध धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक विरासत दिसून येते. आई गंगा, आई यमुना व आई सरस्वती सगळ्यांचे कल्याण करो”.

आणखी वाचा – रश्मिका मंदानाचा अखेर बॉयफ्रेंड व रिलेशनशिपबाबत खुलासा, नक्की कोणाला डेट करते?, म्हणाली, “खासगी आयुष्यात…”

View this post on Instagram

A post shared by Arun Govil (@siyaramkijai)

तसेच अरुण यांनी एका भंडाऱ्यामध्ये भक्तांना प्रसादाचे वाटप केले. त्यांची भेट तेथील बाबा बागेश्वर धाम सरकार धीरेन्द्र कृष्ण शास्त्री यांच्याशी झाली. त्यांनी त्यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत लिहिले की, “आज मला प्रयागराजमध्ये पूज्य बाबा बागेश्वर धाम सरकार धीरेन्द्र कृष्ण शास्त्री यांची भेट घेण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. जय श्री राम”.

आणखी वाचा – ‘रामायण’ फेम दीपिका चिखलिया यांचे घर आहे इतकं सुंदर, व्हिडीओ पाहून सगळेच थक्क, आकर्षक इंटेरियर, महागड्या वस्तू अन्…

दरम्यान अरुण जेव्हा भक्तांमध्ये प्रसाद वाटत होते तेव्हा अनेक लोकांनी त्यांच्या समोर येऊन पाया पडून आशीर्वाद घेत होते. अनेकांनी त्यांच्या नावाचा जयजयकारदेखील केला. प्रसाद घेतल्यानंतर भक्तांनी जय श्री राम असा जयघोषदेखील केला.       

Tags: Arun Govilmahakumbh 2025ramayan
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
twinkle khanna on akshay kumar

"तो माझा मुलगा नाही तर नवरा आहे", अक्षय कुमारच्या बायकोचा 'त्या' कारणावरुन राग अनावर, म्हणाली, "हल्ला करावा वाटतो…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.