रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“निर्बुद्धपणे नकारात्मकता पसरवणं…”, ‘छावा’ला विरोध करणाऱ्यांबाबत मराठी अभिनेत्रीचं वक्तव्य, म्हणाली, “चित्रपट पाहण्यापूर्वीच…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 28, 2025 | 1:29 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ruchira Jadhav on chaavaa movie controversy

‘छावा’ चित्रपटामधील लेझीम नृत्याचा प्रसंग काढल्याची घोषणा केल्यानंतर मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली नाराजी

काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास मांडणारा बहुप्रतीक्षित ‘छावा’ या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला. या ट्रेलरमध्ये शत्रुंशी लढताना विकी कौशलचा रुद्रावतार पाहायला मिळाला आणि राज्याभिषेक सोहळ्याचीही झलक दिसत आहे. तसंच या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज लेझीम खेळतानाचेही दृश्य पाहायला मिळाले. यावरून मोठा वादंग निर्माण झाला. अनेक शिवप्रेमींकडून याबद्दल आक्षेप नोंदवण्यात आला. मंत्री उदय सामंत यांनीही याबद्दल बोलताना “महाराजांच्या सन्मानाला बाधा पोहोचेल अशी कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही” असं म्हणत जणू थेट इशाराच दिला आहे. (Ruchira Jadhav on chaavaa movie controversy)

‘छावा’च्या ट्रेलरमधील लेझीम खेळतानाच्या दृश्यावर वादंग होताच चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सोमवारी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यानंतर लक्ष्मण उतेकरांनी माध्यमांशी संवाद साधताना चित्रपटातील वादग्रस्त लेझीम नृत्याचा प्रसंग काढला जाणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच हा चित्रपट प्रदर्शनाआधी इतिहासतज्ज्ञांनाही दाखविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र लेझीम नृत्याचा प्रसंग काढल्याची घोषणा होताच अनेकांनी दु:खही व्यक्त केलं आहे. अशातच अभिनेत्री रुचिरा जाधवनेही याबद्दल तिची भूमिका स्पष्ट केली आहे.

आणखी वाचा – “तू सर्वकाही करण्यासाठी तयार आहेस ना?”, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काउचचा भयानक प्रसंग, म्हणाली, “वाईट गोष्टी…”

रुचिराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘छावा’ चित्रपटासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने असं म्हटलं आहे की, “मला आवडलं असतं, माझ्या राजाला नवीन रुपात बघायला. ज्याने स्वतःच्या कारकिर्दीत एवढं सगळं झेललं, त्याला त्याचा आनंद ‘परंपरा जपत’ साजरे करताना बघायला”. यापुढे तिने आक्षेप घेणाऱ्यांबद्दल असं म्हटलं आहे की, “Cinema is an Art. मुळात असे दृष्य दाखवण्यामागचा हेतू समजून न घेता चित्रपट बघण्याआधीच निर्बुद्धपणे नकारात्मकता पसरवणं हे किती योग्य आहे? खरंतर या अशा लोकांचा किंवा वृत्तीचा हेतू तपासला गेला पाहिजे”.

आणखी वाचा – ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अभिनेत्याने घेतली महागडी कार, चाहत्यांसह कलाकारांनी केलं कौतुक, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, ‘छावा’ हा चित्रपट येत्या १४ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अभिनेता विकी कौशल साकारत असून दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर औरंगजेबाची भूमिका अभिनेता अक्षय खन्ना याने साकारली आहे.

Tags: chava movie controversyChhaava MovieRuchira Jadhav on chaavaa movie controversy
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
The Family Man 3 new updates Jaideep Ahlawat's character will fight against Manoj Vajpayee

The Family Man 3 मध्ये मनोज वाजपेयी व जयदीप अहलावत यांच्यात रंगणार चुरस, कहाणी आणखी रोमांचक होणार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.