बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

The Family Man 3 मध्ये मनोज वाजपेयी व जयदीप अहलावत यांच्यात रंगणार चुरस, कहाणी आणखी रोमांचक होणार

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 28, 2025 | 3:36 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
The Family Man 3 new updates Jaideep Ahlawat's character will fight against Manoj Vajpayee

'द फॅमिली मॅन सीझन ३' मध्ये जयदीप अहलावतचे पात्र मनोज वाजपेयीला टक्कर देणार

अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी माध्यमाची ओरिजिनल वेब सीरीज ‘द फॅमिली मॅन’ने प्रेक्षकांच्या मनात अशी काही छाप सोडली की, लोक या सीरिजच्या आगामी सीझन्सची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. आतापर्यंत या सीरिजचे दोन सीझन्स प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.पहिल्या दोन सीझनच्या जबरदस्त यशानंतर तिसऱ्या सीझनबाबत चाहत्यांची उत्सुकता वाढत चालली आहे. या सीजनमध्ये अनेक नवीन कलाकारांचे चेहरे दिसणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अनेक चाहत्यांना तिसऱ्या सीझनची प्रतीक्षा लागून आहे. काही दिवसांपूर्वी या सीरिजमध्ये अभिनेता जयदीप अहलावत असणार असल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे ‘द फॅमिली मॅन’च्या तिसऱ्या सीझनमध्ये मनोज वाजपेयीबरोबर जयदीप अहलावतला पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक उत्सुक आहेत. (The Family Man 3 new updates)

जयदीप अहलावत हा मनोजच्या विरुद्ध असणार आहे असे वृत्त समोर येत आहे. जयदीप अहलावत ‘द फॅमिली मॅन सीझन ३’ मध्ये सामील होणार असल्याची बातमी आल्यापासून चाहत्यांना त्याच्या पात्राबद्दलच्या प्रत्येक तपशीलाबद्दल उत्सुकता आहे. अशातच एका सूत्राकडून अशी माहिती समोर येत आहे की, जयदीप अहलावतचे पात्र मनोज वाजपेयीला टक्कर देणार आहे. ‘द फॅमिली मॅन’च्या सीझन ३’ मध्ये जयदीप अहलावतची भूमिका खूप महत्त्वाची असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता या दोघांना एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

View this post on Instagram

A post shared by prime video IN (@primevideoin)

आणखी वाचा – “तू सर्वकाही करण्यासाठी तयार आहेस ना?”, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काउचचा भयानक प्रसंग, म्हणाली, “वाईट गोष्टी…”

या सिरिजमध्ये जयदीप अहलावतच्या आगमनानंतर, मनोज वाजपेयींच्या ‘फॅमिली मॅन’ या सीरिजबद्दल लोकांची उत्कंठा वाढणार आहे, कारण जयदीप अहलावत एक उत्कृष्ट अभिनेता आहे. जयदीप अहलावतने याआधी ‘आक्रोश’, ‘खट्टा मीठा’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘रईस’, ‘राझी’, ‘लस्ट स्टोरीज’ आणि ‘बागी ३’ यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण अभिनय केला आहे.

आणखी वाचा – “निर्बुद्धपणे नकारात्मकता पसरवणं…”, ‘छावा’ला विरोध करणाऱ्यांबाबत मराठी अभिनेत्रीचं वक्तव्य, म्हणाली, “चित्रपट पाहण्यापूर्वीच…”

दरम्यान, चाहत्यांना लवकरच प्रदर्शित होणाऱ्या तिसऱ्या सीझनची प्रतीक्षा आहे. ‘द फॅमिली मॅन’च्या दोन्ही सीझनमध्ये मनोज वाजपेयीचा अप्रतिम अभिनय पाहायला मिळाला, पण आता जयदीप अहलावतचा जबरदस्त अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक ‘द फॅमिली मॅन ३’ या सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Tags: jaideep ahlawat in the family man season 3The Family Man Season 3the family man season 3 .
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Next Post
actress body shaming

बॉडी शेमिंग, लूकवरुन कमेंट ते घाणेरडी वागणूक, इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्रींनी अनुभवले भयानक दिवस, प्रसिद्धी मागचं काळं सत्य

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.