रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सिनेसृष्टीला राम राम करणारी सना खान दुसऱ्यांदा झाली आई, पहिल्यांदाच दाखवली लेकाची झलक, नाव ठेवलं एकदम खास, अर्थ आहे…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 27, 2025 | 12:20 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sana Khan Son Name

सिनेसृष्टीला राम राम करणारी सना खान दुसऱ्यांदा झाली आई, पहिल्यांदाच दाखवली लेकाची झलक, नाव ठेवलं एकदम खास, अर्थ आहे…

Sana Khan Son Name : ‘बिग बॉस’ फेम सना खान नेहमीच प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री राहिली आहे. सोशल मीडियावर सना कायमच चर्चेत असते. सनाने लग्नानंतर व आई झाल्यानंतर सिनेसृष्टीतून काहीसा ब्रेक घेतला. मात्र अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. अशातच आता सना खान दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिच्या पहिल्या मुलाचा जन्म ५ जुलै २०२३ रोजी झाला, त्याचे नाव तिने सय्यद तारिक जमील ठेवले. त्यांनतर तिच्या दुसऱ्या मुलाचा जन्म ५ जानेवारी २०२५ रोजी झाला. मुलगी व्हावी अशी तिची इच्छा होती याबाबत अभिनेत्री व्हिडीओद्वारे व्यक्तही झाली होती.

आता अभिनेत्रीने तिच्या दुसऱ्या लेकाच्या नावाची घोषणाही केली आहे. अभिनेत्रीच्या दुसऱ्या राजकुमाराचे नाव समोर आले आहे. सना खानने २५ जानेवारी रोजी म्हणजेच मुलाच्या जन्माच्या २० दिवसांनंतर लाडक्या लेकाचे नाव जाहीर केले आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. पहिल्या स्लाइडमध्ये, सनाने चाहत्यांना आपल्या मुलासाठी प्रार्थना करण्यास सांगितले आहे आणि दुसर्‍या स्लाइडमध्ये तिने त्याचे नाव सय्यद हसन जमील असल्याचा खुलासा केला आहे.

आणखी वाचा – कुणी तरी येणार येणार गं…; लोकप्रिय मराठी अभिनेता लवकरच होणार बाबा, सिनेमॅटिक व्हिडीओद्वारे दिली गुडन्यूज

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

हसन हे अरबी नाव आहे. याचा अर्थ सुंदर, चांगला किंवा फायदेशीर असा होतो. त्याच वेळी, सनाचा मोठा मुलगा तारिक जमील याच्या नावाचा अर्थ मॉर्निंग स्टार आहे. हे देखील एक अरबी नाव आहे. सनाचा संसार आता पूर्ण झाला आहे. ती तिच्या संसारात खूप आनंदी आहे. या जोडप्याने २२ नोव्हेंबर २०२४ रोजी त्यांच्या गरोदरपणाची घोषणा केली होती.

आणखी वाचा – “सोफ्यावर बसून कोण पूजा करतं?”, संजय दत्तचा ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले, म्हणाले, “देवाला…”

२०२० मध्ये सनाने मुफ्ती अनस सय्यदशी लग्न केले आणि चित्रपटसृष्टीला राम राम केला. २०१७ मध्ये त्यांची मक्का येथे भेट झाली. आणि मग त्याची ओळख होत गेली आणि बोलणी सुरु झाली. तथापि, दोघांच्या वयात ७ वर्षांचे अंतर आहे. पण दोघेही एकत्र आनंदी आहेत आणि आज दोन मुलांचे पालक आहेत.

Tags: sana khanSana Khan Son Nametv actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Urvashi Rautela reacts to trolling

सैफ अली खानवरील हल्ल्याच्या प्रश्नाचं उर्वशी रौतेलाने दिलेलं भलतंच उत्तर, ट्रोल होताच म्हणाली, “पंतप्रधान नरेंद्र मोदी...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.