शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मराठी अभिनेत्याने महाराजांची भूमिका करायला हवी होती”, ‘छावा’चा ट्रेलर पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याची खंत, म्हणाला, “कुठेतरी कमी आहोत…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 25, 2025 | 2:49 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ajinkya Raut on the trailer of Vicky Kaushal Chhaava movie

छावा चित्रपटाच्या ट्रेलरवर आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेबद्दल मराठी अभिनेत्याची खंत

बॉलीवूड अभिनेता विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांची मुख्य भूमिका असलेला ‘छावा’चा ट्रेलर २२ जानेवारीला प्रदर्शित झाला. या ट्रेलरची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा रंगली आहे. यातूनच एक नवा वादही निर्माण झाला आहे. ट्रेलरमधील काही दृश्यांवर शिवप्रेमींकडून नाराजी व्यक्त करण्यात आहे. ‘छावा’च्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज लेझीम खेळताना आणि नृत्य करत असल्याचं दाखविण्यात आलं आहे. त्याचबरोबर ट्रेलरमधील एक डायलॉगही अनेकांना पटला नाहीये. त्यामुळे या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. अशातच आता ‘छावा’बद्दल एका मराठी अभिनेत्यानेही त्याची प्रतिक्रिया दिली आहे आणि हा अभिनेता म्हणजे अजिंक्य राऊत. (Ajinkya Raut Vicky Kaushal Chhaava movie)

एका चाहत्याने अजिंक्यला “विकी कौशलच्या ‘छावा’च्या ट्रेलरबद्दल तुमचं मत काय आहे?” असा प्रश्न विचारला, चाहत्याच्या या प्रश्नाला उत्तर देत अजिंक्यने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि यामध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “मस्त, ट्रेलर तर खूपच कमाल आहे. विकी कौशल एक उत्तम अभिनेता आहे. पण महाराजांची भूमिका करण्यासाठी मला वाटतं एका मराठी अभिनेत्याला मोठ्या पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली असती तर आणखी बरं झालं असतं. कारण महाराजांची भूमिका एका मराठी अभिनेत्याने साकारली असती तर बरं झालं असतं”.

View this post on Instagram

A post shared by Ajinkya Valmik Raut (@ajinkyathoughts)

आणखी वाचा – पूजा सावंतच्या वाढदिवसाला नवऱ्याची रोमँटिक पोस्ट, युनिक टोपण नावाने मारतो हाक, म्हणाला, “तुझ्या हास्यामुळे…”

यापुढे तो असं म्हणाला की, “आपण मराठी कलाकार म्हणून किंवा मराठी इंडस्ट्री म्हणून कुठेतरी कमी पडत आहोत असं वाटतं लहान तोंडी मोठा घास पण मराठी प्रेक्षक म्हणून आणि मराठी इंडस्ट्रीचा एक प्रतिनिधी म्हणून माझी इच्छा आहे की, त्याठिकाणी अशी कुणी व्यक्ती असली असती. किंवा माझी अजूनही इच्छा आहे की इथून पुढे तरी कुणी तरी असं यावं की जो तिथे प्रतिनिधित्व करु शकेल, ज्या मराठी भूमिका आहेत. जसं की चंदू चॅम्पियन, मुंज्या… शिवाय महाराजांची भूमिका असो”.

आणखी वाचा – Bigg Boss फेम प्रसिद्ध युट्यूबवर FIR नोंदवण्याचे कोर्टाचे आदेश, पाठलाग व धमकीचा आरोप

दरम्यान, ‘छावा’मध्ये विकी, रश्मिकासह अनेक मराठी कलाकारही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे यांसारखे मराठी कलाकार चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. तर, ‘छावा’मध्ये औरंगजेबच्या भूमिकेत अभिनेता अक्षय खन्ना दिसणार आहे. ‘छावा’चं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. येत्या १४ फेब्रुवारी रोजी ‘छावा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Tags: Ajinkya Raut Vicky Kaushal Chhaava movievicky kaushalvicky kaushal chhaava
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
mamta kulkarni sanyasi

अभिनेत्री ममता कुलकर्णींनी अध्यात्माचा मार्ग का निवडला?, किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वरची मिळाली पदवी कारण…; सांगितलं सत्य

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.