प्रत्येक व्यक्तीला जसं आपलं कुटुंब महत्वाचं असतं, तसं कुटुंबालाही ती महत्वाची असते. कारण कुटुंबामुळे नात्यातील भावविश्व अधोरेखित होते. कुटुंबातील एखादी व्यक्ती भलेही कितीही लांब असली, पण त्याचं आणि कुटुंबाचं नातं कधीच संपत नाही. त्यामुळे समाजात कुटुंबसंस्थेला एक वेगळं स्थान आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री हेमांगी कवी आपल्या अभिनयामुळे घराघरात ओळखली तर जातेच. शिवाय ती सोशल मीडियावर सतत काही ना काहीतरी व्यक्त होताना दिसते. हेमांगीने मालिका, नाटक, सिनेमा व वेबसिरीज अश्या सर्वच माध्यमांमध्ये आपला अभिनयाचा दर्जा प्रेक्षकांना दाखवलेला असून त्याची पावती तिला नेहमीच मिळत राहते. अभिनयक्षेत्रात व्यस्त असूनही हेमांगी अनेक मुद्द्यांवर व्यक्त होते, ज्यामुळे ती अनेकदा चर्चेत असते. आता हेमांगीने आपल्या चाहत्यांसमोर एक फोटो शेअर केला आहे, ज्यात तिने तिच्या कुटुंबाची एक आठवण ताजी करताना एक वक्तव्य केलंय. (hemangi kavi)
अभिनेत्री हेमांगी कवी ‘दो गुब्बारे’ या वेबसिरीजमध्ये झळकणार आहे. त्यानिमित्त केलेल्या या पोस्टमध्ये हेमांगीने तिच्या कुटुंबाचा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये हेमांगीचे आई, वडील, भाऊ व बहीण दिसत आहे, पण हेमांगी दिसत नाही. पण ती या फोटोमध्ये असल्याचे हेमांगीने म्हटलंय. हा फोटो शेअर करताना हेमांगी म्हणते, “हा आमचा Family photo! माझे आई, बाबा, भाऊ, बहीण आणि मी! पण तुम्हांला यात चारच माणसं दिसताएत ना! अंहं, मी धरून पाच आहेत! मी खरंच आहे या फोटोत.” (hemangi kavi share family photo)
हेमांगी पुढे म्हणते, “लहान असताना सगळ्यांनीच आपल्या आई-बाबांच्या लग्नात आपण का नव्हतो, असे प्रश्न विचारून आपल्या घरच्यांना हैराण केलेलं आहे. पुर्वी घरात आलेल्या पाहुण्यांना आपले album दाखवायची पद्धत होती. आता हे ऐकताना odd वाटत असलं, तरी ही पद्धत किंवा सवय म्हणूया Social Media वर आपण अबाधित ठेवलीए! तेव्हा त्या चार लोकांसमोर आपल्या पालकांची ‘आता हे कसं समजावयचं?’ झालेली नाजूक परिस्थिती आपल्याला ‘कळायला’ लागल्यावर लक्षात येते आणि ते आठवून आताही हसायला येतं!” असं म्हणत हेमांगीने या लहानपणीची आठवण सांगितली.
हे देखील वाचा : ‘इव्हेंट कॅन्सल झाला आणि’…अविनाश-ऐश्वर्या यांचा व्हायरल व्हिडिओ
पुढे तिने म्हटलंय “आपण प्रत्यक्षपणे नसलो तरी वेगळ्या जगात अस्तिवात होतो! आयला म्हणजे आपण सुद्धा आहोत की या फोटोत! केवढा तो आनंद! आता हे खरं की खोटं माहीत नाही. पण माझ्या बालबुद्धीला पटेल अशी story सांगून माझ्या आईने मी त्यांचीच मुलगी असल्याची खात्री दिली आणि तु पण होतीस या photo मध्ये सांगून आपलेपणाची मुळं कायमची घट्ट पेरली! आपल्याला कुणीतरी धरून आहे प्रत्यक्ष अप्रत्क्षपणे ही Feeling किती कमाल असते नाई? माझ्यासाठी हाच माझा Do Gubbare Moment आहे!” तिच्या या पोस्टची जोरदार चर्चा होत आहे. (hemangi kavi family photo)
