अभिनेता आदिनाथ कोठारे हा त्याच्या अभिनय कौशल्यासोबत दिग्दर्शन आणि निर्मिती मुळेही प्रेक्षकांच्या पसंतीस पडतो. सोशल मीडियावर ही आदिनाथ बऱ्यापैकी सक्रिय असतो. तो स्वतःसोबतच लेक जिजाचेही अनेक व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत असतो. विशेष करून जिजा आणि तिच्या डॅडाचे संवाद तर कम्माल हिट झाले आहेत. चाहतेही त्यांच्या या संवादाला भरभरून प्रतिसाद देत आहेत. आता आदिनाथने त्याच्या आजीसोबतच्या अशाच एका संवादाची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. (Adinath Kothare and Jija Kothare)
आदिनाथ त्याच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढून लेकीसोबत क्वॉलिटी टाईम शेअर करत असतो. मोकळ्या वेळेचा सदुपयोग तो त्याच्या लेकीसोबत वेळ घालवत करत असतो. अशातच पुन्हा एकदा आदिनाथने लेकीसोबतचा एक संवाद सोशल मीडियावरून पोस्ट केला आहे.
पाहा आदिनाथच्या पोस्टवर कमेंट करत उर्मिलाबद्दल काय म्हणाले चाहते (Adinath Kothare and Jija Kothare)
आदिनाथने शेअर केलेल्या या संवादामध्ये जिजा आदिनाथला विचारतेय की, “डॅडा आपण कुठे चाललोय?” यावर आदिनाथ म्हणतोय, “पावसामुळे रस्ता दिसत नाही आहे.” यावर जिजा विचारतेय, “आपण हरवलो तर ?” तेव्हा आदिनाथ म्हणतोय, “एकत्र असताना कसे हरवू?” त्यावर जिजा विचारतेय, “तू जर एकटा असतास तर?” तेव्हा आदिनाथ म्हणतोय “हरवलो असतो.” आता आदिनाथ आणि जिजाच्या या संवादावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.
दरम्यान एका चाहतीची कमेंट अधिक लक्षवेधी आहे, यांत त्या चाहतीने म्हटलं आहे की, ‘जिजाच्या मम्मीच discussion का नाही यांत’, तर अनेक कमेंट अशा आल्या आहेत की ‘खूप छान संभाषण आहे’.
हे देखील वाचा – एअरपोर्टवर नवऱ्याला पाहून चेतनला आलं रडू, व्हिडीओ होतोय वायरल
आदिनाथच्या या पोस्ट वर आलेल्या कमेंटवरून असं कळतंय की, चाहते जिजा आणि आदिनाथच्या क्वॉलिटी टाईममध्ये उर्मिलाला मिस करत आहेत. आदिनाथ सोशल मीडियावर पोस्ट करत असलेल्या जिजा आणि डॅडाच्या किस्स्यांना चाहतेही पसंती दर्शवत आहेत.
