‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात कॉमेडीचं परफेक्ट टायमिंग आणि ‘अगं अगं आई, बाबा ओरडू ओरडू, मला घाबरू घाबरू..’ या ओंकारच्या संवादाने समस्त प्रेक्षकांना वेड लावले. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून ओंकारने एक्झिट जरी घेतली असली तरी आजही सारा महाराष्ट्र ओंकारच्या स्किट्सला, ओंकारला मिस करताना दिसतोय. (Onkar bhojane new song)
एक बहुगुणी कलाकार म्हणून महाराष्ट्राचा लाडका अभिनेता ओंकार भोजने याकडे पाहिलं जातं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून साऱ्या महाराष्ट्राला वेड करणाऱ्या ओंकारने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या दिलावर राज्य केलं. ओंकारने गायलेलं एक गाणंही सोशल मीडियावर बरंच व्हायरल झालं होतं.
पाहा ओंकारच्या नव्या गाण्याची खास झलक (Onkar bhojane new song)
यानंतर ओंकारचा असाच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच चर्चेत आला आहे. एका कार्यक्रमादरम्यान त्याने नुकतीच हजेरी लावली होती. ओंकार मूळचा कोकणातला आहे. कोकणातल्या चिपळूणचा तो असून त्याच त्याच्या गावावर खास प्रेम आहे. कार्यक्रमादरम्यान त्याने चिपळूण आमचं गाव रे हे गाणं गात प्रेक्षकांची मनं जिंकली. चला तर पाहुयात ओंकारच्या या गाण्याची खास झलक.
सर्वांना हसविण्यात तरबेज असलेला आणि ‘कोकण कोहिनूर’ म्हणून साऱ्या रसिक प्रेक्षक वर्गाचा लाडका अभिनेता ओंकार आता मालिकाविश्वातून बाहेर येत सिनेविश्व आणि नाटकविश्वाकडे वळला आहे. एकांकिका क्षेत्रापासून ओंकारने अभिनयाची सुरुवात केली. मध्यंतरी त्याने छोट्या पडद्यावर आपला वावर वाढवला होता.त्यानंतर त्याने चित्रपटसृष्टीकडे पावलं टाकत ‘सरला एक कोटी’ हा चित्रपट केला. ‘करून गेलो गाव’ या नाटकातून आता पुन्हा एकदा तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हे नाटक कोंकणी असून या नाटकांत तो अभिनेता भाऊ कदम सोबत रंगमंच शेअर करताना दिसतोय.