Tula Shikvin Changlach Dhada : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत येणाऱ्या नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे. मालिकेतील अक्षरा-अधिपती यांच्याशिवाय भुवनेश्वरीची भूमिकाही प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. मालिकेत सध्या अक्षरा-अधिपतीमध्ये दुरावा आल्याचा सीक्वेन्स सुरु आहे. सतत होणाऱ्या भांडणांना कंटाळून अधिपती अक्षराला घर सोडून जाण्याचा सल्ला देतो. यावर अक्षरासुद्धा काहीही आक्षेप न घेता घराबाहेर पडण्याचा निर्णय घेते. त्यानंतर मालिकेत अक्षराच्या गरोदर असल्याचा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. गेले काही दिवस अक्षरा-अधिपती यांच्यात अबोला आहे आणि हा अबोला कमी होण्याऐवजी आणखीच वाढताना दिसत आहे. अशातच मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. (Tula Shikvin Changlach Dhada daily updates)
मकर संक्रांतीनिमित्त अधिपती अक्षराला पुन्हा घरात आणण्यासाठी जाणार आहे. याचा एक नवीन प्रोमोही समोर आला आहे. या नवीन प्रोमोमध्ये अधिपती असं म्हणतो की, आज मास्तरीनबाईंना घरी घेऊनच जाणार”. त्यानंतर तो अक्षराच्या घरी पोहोचतो. तेव्हा घरात फक्त तिची बहीण असते. त्यानंतर घरात कुणी नसलेलं बघून तो अक्षराच्या बहिणीला “घरातले सगळे कुठे गेले आहेत?” असं विचारतो. यावर तिची बहीण “सगळे बाहेर आहेत आणि ताई तर सकाळीच तिच्या मित्राबरोबर बाहेर गेली आहे” असं म्हणते. यामुळे अधिपती काहीसा नाराज होतो आणि मास्तरीनबाई ठीक आहे ना असं विचारतो. यावर बहीण उत्तर देत असं म्हणते की, “तिचा मित्र आल्यापासून ती खूप खुश आहे”.
त्यानंतर पुढे अक्षरा सूर्यवंशींच्या घरात एन्ट्री करते. मात्र अक्षरा घरात शिरताच भुवनेश्वरी तिला अडवते. “आल्या पाऊली परत जा” असं ती अक्षराला म्हणते. यावर ती “घर सोडलं तर नातं कशाला जोडत आहे” असं तिला म्हणते. त्यानंतर अक्षरा भुवनेश्वरीला ठणकावत असं म्हणते की, “तुमचं लग्न झालेलं नाही तरी तुम्ही घर सोडलं नाहीत आणि नातंही तोडलं नाहीत. देवा-ब्राम्हणांच्या साक्षीने आमचं लग्न झालं आहे. हे घर माझं आहे” असं म्हणते.
त्यामुळे आता अक्षरा सूर्यवंशींच्या घरात तर आली आहे. पण या घरात तिचा निभाव लागणार का? अक्षराच्या बहिणीने अक्षराबद्दल अधिपतीला सांगितले आहे? त्यातून आता त्यांच्यात काही नवीन गैरसमज निर्माण होणार का? हे लवकरच आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे