Ranbir Kapoor With Raha : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची मुलगी राहा कपूर पापाराझींच्या आवडत्या स्टार किड्सपैकी एक आहे. सर्वसामान्यांनाही राहा खूप आवडते. आलिया पाठोपाठ राहा आता चाहत्यांच्या आवडती झाली आहे. तिचा गोंडस चेहरा आणि वर तिची निष्पाप कृती प्रत्येक वेळी लोकांची मनं चोरताना दिसतात. यावेळीही असेच काहीसे घडले आहे. यावेळी स्वतः रणबीर आपली मुलगी राहाबरोबर खेळाच्या मैदानात वेळ घालवताना दिसला. वास्तविक, ही छायाचित्रे काही खेळाच्या मैदानातील आहेत. जिथे रणबीर आणि आलियाची मुलगी राहा खेळाच्या मूडमध्ये दिसत आहे.
समोर आलेल्या फोटोंमध्ये राहाच्या पायात चप्पल नाही आणि ती इकडे तिकडे गवतावर धावताना दिसत आहे. तर तिच्या जवळच बसलेले तिचे वडील रणबीर याची नजर लेकीवर खिळलेली आहे. आणि खेळता खेळता राहा पप्पाकडे धावत येताना दिसतेय. यानंतर दोघांमध्ये काहीशी मस्ती होताना दिसते. त्याचवेळी राहाही आनंदाने हसताना दिसत आहे. एका फोटोमध्ये रणबीर त्याच्या मांडीवर बसून तिला मिठी मारताना दिसत आहे.
आणखी वाचा – अनुष्काचा खरा चेहरा आला समोर, पारू अहिल्यादेवींसमोर सत्याचा उलगडा करणार का?, मोठा ट्विस्ट

यातील काही छायाचित्रांमध्ये रणबीर कपूरने कपाळावर फुलांचा हेअरबँडही घातला आहे. या हेअरबँडमध्ये पापाला पाहून राहाला हसू आवरत नाही असे दिसतेय. त्याच्या एका मुलाखतीत रणबीरने राहाबरोबरचा त्याच्या आवडत्या क्षणाचा खुलासा केला होता. यावेळी रणबीर म्हणाला होता, “राहाला डोळा मारणे, तिने मला लगेच ओळखणे, मला मिठी मारणे, माझे चुंबन घेतले. माझ्यासाठी यापेक्षा दुसरा कोणताही क्षण विशेष असेल असे मला वाटत नाही”.
त्याच मुलाखतीत ते म्हणाले होते, “रविवारी मी माझी मुलगी राहाबरोबर खूप वेळ घालवतो आणि घरी बनवलेले जेवण खातो. मी फुटबॉल, गोल्फ किंवा पॅडल टेनिस खेळतो”. रणबीर व आलिया नेहमीच तिच्या मुलींबरोबर स्पॉट होताना दिसतात. रणबीर व आलिया यांचे बांद्रा येथील लेकीसाठी बांधलेले आलिशान घरही आता तयार झाले आहे. लवकरच ते या नव्या घरात लेकीसह राहायला जाणार आहेत.