एकीकडे बॉलीवूडचा किंग शाहरुख खान त्याचा आगामी सिनेमा ‘जवान’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असताना आता सलमानच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. भाईजान सलमान खानचा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘किसी का भाई, किसी की जान’ बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नसला, तरी त्याची क्रेझ कायमच आहे. आता सलमानच्या ‘टायगर 3’ सिनेमाच्या टीझरची रिलीज डेट जाहीर झाली असून चाहते व प्रेक्षकांना त्याच्या आगामी सिनेमाची उत्सुकता लागलेली आहे. (tiger 3 teaser)
व्हायरल झालेल्या सोशल मीडिया पोस्टनुसार, सलमानच्या आगामी सिनेमाचा टिझर शाहरुख खानच्या ‘जवान’ सिनेमासोबत मोठ्या पडद्यावर रिलीज होणार असल्याचे सांगण्यात येतंय. विशेष म्हणजे, शाहरुखच्या ब्लॉकबस्टर सिनेमा ‘पठाण’मध्ये सलमान खानने कॅमिओ रोल केला असून त्यातच ‘टायगर 3’बाबतचे संकेत दिले होते. सलमान खानचा हा बहुचर्चित सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होणार असून ७ सप्टेंबरला सिनेमाचा पहिला टिझर रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी शाहरुखचा ‘जवान’ सिनेमाही रिलीज होणार असून सलमानचे चाहते याबाबत खूप उत्सुक आहेत.
ही आहे ‘टायगर 3’च्या टिझरची रिलीज डेट (tiger 3 teaser release date)
एका सिने समीक्षकाने केलेल्या ट्विटमधील माहितीनुसार, सलमानच्या ‘टायगर 3’चा फर्स्ट लुक १५ ऑगस्टला, त्यानंतर सिनेमाचा टीझर जवानसोबत रिलीज होणार आहे. २८ सप्टेंबरला सिनेमाचा पहिला ट्रेलर, तर २५ ऑक्टोबरला दुसरा ट्रेलर लाँच होईल. २ नोव्हेंबरला शाहरुख खानचा सिनेमातील पोस्टर रिलीज होणार असून १० नोव्हेंबरला हा सिनेमा जगभरातील सिनेमागृहात रिलीज होणार आहे. हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून सलमानचे चाहते यावर आनंद व्यक्त करत आहे. (tiger 3 teaser)
#SalmanKhan's #Tiger3 promotional road map.
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) July 23, 2023
15 August – Character teaser
7 September – Tiger 3 Teaser [Attached with #Jawan]
28 September – Trailer 1
6 October – Song 1
16 October – Song 2
25 October – Trailer 2
2 November – #ShahRukhKhan poster
7 to 9 November – Promo… pic.twitter.com/jGjQGhM2O2
शाहरुखच्या सिनेमाबाबत बोलायचे झाल्यास तो लवकरच ‘जवान’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून एटली दिग्दर्शित या सिनेमात शाहरुखसह अभिनेता विजय सेतुपती, अभिनेत्री नयनतारा व अन्य कलाकारर झळकणार आहे. हा सिनेमा ७ सप्टेंबरला हिंदीसह तेलगू व तामिळ भाषेत जगभरातील सिनेमागृहांत रिलीज होणार आहे. (salman khan tiger 3)
