अनेक कलाकार आज हयात नसले तरीही त्यांनी साकारलेल्या अनेक कलाकृती आज ही जिवंत आहेत. प्रेक्षकांच्या मनात घर केलेले असेच एक अभिनेते म्हणजे दादा कोंडके. अनेक चित्रपट, लोकनाट्य यांच्या माध्यमातून दादा कोंडके यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि मराठी मनोरंजन विश्व आणखी समृद्ध केलं. पण चित्रपट आणि नाटकां व्यतिरिक्त दादा ओळखले जातात ते त्यांच्या अभिनयाप्रति असलेल्या अपार श्रद्धेसाठी.
एकदा दादा कोंडके यांनी मराठी चित्रपट सृष्टीतील एका अभिनेत्याला नाटकाला येण्यासाठी बंदी घातली होती. दादांनी का उचललं हे पाऊल हे त्यांनी एका पुस्तकात सांगितलं आहे.(dada kondke)
दादा कोंडके यांच्या लोकप्रियते सोबत आणखी एक अभिनेते त्याकाळी आणखी एक नाव त्या काळीअभिनेता चांगलंच चर्चेत होतं. ते म्हणजे अभिनेते काशिनाथ घाणेकर. काशिनाथ घाणेकर हे उत्तम अभिनेते होते घाणेकर आणि हाऊसफुल नाटक हे समीकरण जणू काशिनाथ घाणेकर यांच्या बाबतीत लागू होतं. पण दुर्देव हे कि त्याकाळी त्यांना फक्त दारूचं व्यसन होतं. परंतु नाटकाच्या दरम्यान कितीही दारू प्यायले असले तरीही मंचावर आल्यावर त्यांचा अभिनय एवढा बहरून यायचा कि कोणाला तिळमात्र ही शंका नसायची कि त्यांनी दारू प्यायली आहे.

एवढं होऊन पण मैत्री कायम राहिली (dada kondke)
पण कालांतरानी काशिनाथ यांचं हे व्यसन एवढं वाढलं कि दादांच्या ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटका दरम्यान चक्क ते दारू पिऊन पोहचले. दादांच्या चालू प्रयोगात घाणेकरांनी समोरून स्टेजवर चढून गोंधळ घातला दादांनी त्यावेळी कसं बस त्यांना सावरलं पण पुढे बऱ्याचदा हा प्रसंग पुन्हा पुन्हा घडू लागला. शेवटी दादा कोंडके यांनी घाणेकराना सक्त ताकीद दिली “तू दारू पिऊन प्रयोगाला येत काम नये, आलास तरी दारू न पिता ये नाहीतर तुला कायमची बंदी घालावी लागेल”.(viccha mazi puri kara)
हे देखील वाचा – ‘त्यांनी वर्तमान पत्रातून दादांची केली बदनामी पण झालं नाव’ शिस्तबद्द दादांची शिस्त आणि रत्नागिरीत झाली कमाल…
दादांनी पुढे सांगितलं काशिनाथ घाणेकरांसारख्या महान कलावंताला अशी वागणूक देणं मला आवडलं नाही पण माझा नाईलाज झाला. पण दादांच्या या कृत्यावर घाणेकर न रागवता त्यांनी ही मैत्री पुढे कायम ठेवली.(dada kondke kashinath ghanekar)