शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लेकीसह ‘बार्बी’ चित्रपट पाहायला गेलेली जुही परमार १० मिनिटांतच थिएटरमधून बाहेर, म्हणाली, “आक्षेपार्ह सीन्स…”

Darshana Shingadeby Darshana Shingade
जुलै 26, 2023 | 9:45 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Juhi parmar accuses barbie makers

Juhi parmar accuses barbie makers

सध्या सर्व ठिकाणी ‘बार्बी’ व ‘ओपनहायमर’ या हॉलीवूड चित्रपटांची जोरदार चर्चा सुरु आहे, अनेक कलाकार देखील आवर्जून या चित्रपटाची दखल घेत आहेत.या पार्श्वभूमीवर अभिनेत्री जुही परमारने तिचे ‘बार्बी’ चित्रपटाविषयीचे मत व्यक्त केले आहे. ‘बार्बी’ चित्रपटाविषयी लहान मुलांच्या मनात एक आकर्षण आहे, म्हणूनच ‘कुमकुम’ फेम अभिनेत्री जुही तिची १० वर्षांची मुलगी सामायरा हिला घेऊन ‘बार्बी’ चित्रपट पाहायला गेली होती, पंरतु चित्रपट सुरु झाल्यांनतर अवघ्या १०, १५ मिनिटांमध्येच संपूर्ण चित्रपट न पाहता जुही मुलीला घेऊन चित्रपटगृहातून बाहेर आली. (juhi parmar accuses barbie makers)

जुहीने नेमकं असं का केलं? त्यामागे काय कारण होत? आणि चित्रपटाविषयी जुहीचं काय मत आहे. या विषयी जुहीने स्वतःच खुलासा केला आहे. जुहीने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरून चित्रपटाच्या निर्मात्यांसाठी पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्ट मध्ये जुहीने चित्रपटाबाबत तिला खटकणाऱ्या गोष्टी सविस्तरपणे मांडल्या आहेत.

पाहा का संतापली अभिनेत्री जुही परमार? (juhi parmar accuses barbie makers)

जुहीने त्या पोस्ट मध्ये म्हंटल आहे, “प्रिय ‘बार्बी’ सर्वप्रथम मी माझी चूक मान्य करते. कारण- माझ्या १० वर्षांच्या समायराला मी तुमचा चित्रपट पाहायला घेऊन गेले. हा चित्रपट ‘पीजी-१३’ (पॅरेंटल गायडन्स अंडर १३) आहे याकडे मी लक्ष दिले नाही. चित्रपट सुरू झाल्यावर सुरुवातीच्या १० मिनिटांत असलेले आक्षेपार्ह भाषा, सीन्स पाहून मला चित्रपटगृहातून बाहेर पडावे लागले. मी माझ्या मुलीला हे काय दाखवले, असा प्रश्न मला पडला. ती तुमचा चित्रपट पाहण्यासाठी फार उत्सुक होते; परंतु, प्रत्यक्ष चित्रपट पाहिल्यावर मला धक्का बसला आणि मी निराश झाले.”(juhi parmar accuses barbie makers)

“सुरुवातीच्या १० ते १५ मिनिटांत मी बाहेर पडले. अनेक पालक त्यांच्या लहान मुलांसह चित्रपट पाहण्यासाठी आले होते. या ठिकाणी मी आवर्जून नमूद करू इच्छिते की, तुमच्या चित्रपटाची भाषा १३ वर्षांखालील नाही, तर त्याहून अधिक वयाच्या मुलांसाठीही अयोग्य आहे.”चित्रपटगृहातून घरी आल्यावर मी ‘बार्बी’चे प्रोमो तपासले, तेव्हा माझ्या लक्षात आले की, आक्षेपार्ह भाषा, सीन्स प्रोमोमध्ये दाखवण्यात आलेले नाहीत. मग ही लोकांची दिशाभूल नाही का? पण, हे केवळ ‘बार्बी’बद्दल नसून आमच्याकडीलसुद्धा निम्म्याहून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये खूप अयोग्य कंटेंट दाखवला जातो.

View this post on Instagram

A post shared by Juhi Parmar (@juhiparmar)

तुमच्यापैकी काही जणांना माझे मत पटणार नाही किंवा राग येईल. पण, हे पत्र सगळ्या पालकांसाठी आहे. मी केलेली चूक तुम्ही करू नका. कृपया चित्रपट पाहायला जाण्यापूर्वी संपूर्ण खात्री करा.” असे जुहीने या पत्रात नमूद केले आहे. परंतु दुसऱ्या बाजूला जुहीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतलेला देखील पाहायला मिळतो. १०, १५ मिनिट चित्रपट बघून चित्रपट वाईट आहे की नाही हे ठरवण्यापेक्षा संपूर्ण चित्रपट पाहून हे वक्तव्य करणं योग्य ठरलं असत. अशा कमेंट्स पाहायला मिळतात.(juhi parmar accuses barbie makers)

हे देखील वाचा : अवधूत गुप्तेंच्या घरात माकडाने घातला धुमाकूळ, व्हिडिओ होतोय वायरल

Tags: Actress Juhi ParmarBarbie moviebollywood newsjuhi parmarJuhi Parmar watching Barbie movie
Darshana Shingade

Darshana Shingade

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
arun kadam adhik mass special video

अधिकमासनिमित्त अरुण कदम यांनी केला लेक व जावयाचा मानपान

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.