शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“रिप्लेसमेंटवाल्या भूमिका करु नये आणि…”, तेजश्री प्रधानच्या एक्झिटनंतर मुक्ता साकारणाऱ्या अभिनेत्रीला प्रेक्षकांचा सल्ला, दिलं सडेतोड उत्तर

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 10, 2025 | 5:41 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Actress Swarda Thigale expressed her reaction to the comparison with Tejashri Pradhan who exited from Premachi Gosht serial.

तेजश्री प्रधानबरोबरच्या तुलनेवर अभिनेत्री स्वरदा ठिगळेची प्रतिक्रिया

स्टार प्रवाहवरील टीआरपीच्या शर्यतीत कायम अग्रेसर असणारी मालिका म्हणजे ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका. नवनवीन ट्विस्टने चर्चेत राहणारी ही मालिका नुकतीच एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आणि या चर्चेचं कारण म्हणजे अभिनेत्री तेजश्री प्रधानने या मालिकेतून घेतलेला निरोप. मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत असताना आणि टीआरपीमध्येही मालिका हिट होत असताना तेजश्रीने अचानक मालिका का सोडली? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. तेजश्री प्रधानने मालिका सोडल्यानंतर आता अभिनेत्री स्वरदा थिगळे ही मुक्ताची भूमिका साकारणार आहे. स्वरादाने ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेचे शूटिंग सुरु केल्याचे सोशल मीडिया स्टोरी मधून कळवले. (swarda thigale reaction on comparison)

प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये आता तेजश्री ऐवजी स्वरदा ठिगळे नवीन मुक्ता साकारणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये साहजिकच नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. अनेकांना नवीन मुक्ताच्या  भूमिकेत पाहणे कठीण जात आहे. त्यामुळे चाहते याबद्दल अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. त्यामुळे अनेक जण याबद्दल त्यांच्या समिश्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. अशातच ‘मराठी सीरियल ऑफिशियल’ या एंटरटेनमेंट इन्स्टाग्राम पेजवर स्वरदा ठिगळेची पोस्ट शेअर करण्यात आली होती. ज्यावर एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत असं म्हटलं की, “रिप्लेसमेंटवाल्या भूमिका कलाकारांनी घेऊ नये. त्यांनी कितीही चांगलं काम केलं तरी बिचाऱ्यांची बऱ्याचदा तुलना होते आणि तिरस्कार सहन करावा लागतो”.

आणखी वाचा – “एकटीनेच करतेस नवरा नाहीच आणि…”, अमृता खानविलकरच्या गृहप्रवेशाच्या व्हिडीओवर नेटकऱ्याची कमेंट, म्हणाली, “अहो टीझरवरुन…”

यावर त्या इन्स्टाग्राम पेजने प्रत्युत्तर दिलं आहे की, “हे खरं आहे. अगदी खरं आहे. पण ते त्यांचं काम करत आहेत. तुलना होणारच आहे. पण एक उदाहरण, ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील संजनाची रिप्लेसमेंट चांगली होती. रुपाली सगळ्यांना आवडली. तर बघूयात आता ‘प्रेमाची गोष्ट’चं काय होत आहे?” हीच स्टोरी स्वरदाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे आणि असं म्हटलं आहे की, “ “आजही कलेचे असे खरेखुरे चाहते आहेत म्हणून कलाक्षेत्रात उत्तम काम करत राहण्याची ऊर्जा मिळते. माझ्या नव्या कामासाठी पाठिंबा आणि शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार”.

आणखी वाचा – बायकोच्या डोहाळ जेवणालाही जाऊ शकला नाही संग्राम साळवी, म्हणाला, “वाईट वाटलं पण…”

दरम्यान, आता स्वरदा तेजश्रीची जागा घेऊन तिच्यासारखंच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणार का? यामध्ये तिला कितपत यश मिळेल? हे आगामी दिवसांत पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे. तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिने याआधी ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’, ‘सावित्री देवी कॉलेज अँड हॉस्पिटल’, ‘माझे मन तुझे झाले’, ‘वेलकम होम’ यांसारख्या मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Tags: swarda thigaleswarda thigale premachi goshtaSwarda Thigale reaction on comparison
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
divorce blame on wives

घटस्फोट झाला पण संसार थाटला नाही म्हणून अभिनेत्रींनाच ठरवलं गेलं दोषी, वारंवार असं का घडतं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.