रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘तारक मेहता…’ फेम सोढीची प्रकृती गंभीर, रुग्णालयामध्ये सुरु आहेत उपचार, १९ दिवसांपासून अन्न-पाणीही पोटात नाही अन्…

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 10, 2025 | 1:20 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah fame Gurucharan Singh stopped eating and drinking for the last 19 days.

तारक मेहता का उलटा चष्मा फेम गुरुचरण सिंहची प्रकृती चिंताजनक, १९ दिवसांपासून खाणं-पिणं सोडलं

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत रोशन सिंह सोढीची भूमिका साकारलेला अभिनेता गुरुचरण सिंहची प्रकृती अचानक खालवली असल्याचे वृत्त समोर येत आहे. अचानक खालवलेल्या प्रकृतीमुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गुरुचरणची मैत्रीण भक्ती सोनीने त्याच्या प्रकृतीविषयीची माहिती दिली आहे. गेल्या १९ दिवसांपासून त्याने खाणं-पिणं सोडून दिलं होतं, अशी धक्कादायक माहिती भक्तीने दिली आहे. इतकंच नव्हे तर रुग्णालयात गुरुचरणचे कुटुंबीयसुद्धा उपस्थित नाहीत. त्याच्या कुटुंबीयांना फोन ‘स्विच ऑफ’ करुन ठेवल्याचं भक्तीने सांगितलं आहे.(gurucharan singh health update)

भक्ती सोनीने गुरुचरणच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली आहे. “दुर्दैवाने त्याची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे. त्याला दोन वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याची प्रकृती आणखी खराब झाल्यानंतर त्याला सरकारी रुग्णालयात पुन्हा दाखल करण्यात आलं. सध्या सरकारी रुग्णालयातच त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याच्या प्रकृतीविषयी माहिती मिळवण्यासाठी मी त्याच्या आईच्या सतत संपर्कात आहे”, असं भक्तीने ‘इंडिया टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Gurucharan Singh official (@sodhi_gcs)

आणखी वाचा – “पप्पा जाऊन चार वर्षे झाली पण…”, वडिलांच्या आठवणीत रवी जाधव भावुक, म्हणाले, “त्यांची आठवण…”

भक्ती सोनीने पुढे असंही म्हटलं की, गुरुचरण गेल्या १९ दिवसांपासून अन्न-पाण्याविना राहत होता. त्याने सर्व गोष्टींचा त्याग केला होता. म्हणून त्याची शुद्ध हरपली आणि त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याने काम मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्याला यश मिळालं नाही. त्याच्यावर १.२ कोटी रुपयांचं कर्ज आहे. पण त्याच्या वडिलांकडे ५५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. दुर्दैवाने प्रॉपर्टीसंदर्भात काही वाद सुरू आहेत. जर हे प्रकरण मिटवता आलं आणि प्रॉपर्टी विकली गेली, तर गुरुचरण त्याचं कर्ज फेडू शकेल” असं तिने म्हटलं आहे.

आणखी वाचा – अंकिता वालावलकरची लगीनघाई! कपडे खरेदीला सुरुवात, बहिणींबरोबर करत आहे जय्यत तयारी

दरम्यान, काही दिवसांपूर्वी गुरुचरणने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने असं म्हटलं होतं की, “परिस्थिती खूपच वाईट झाली आहे”. या व्हिडीओमध्ये त्याच्या हाताला सलाईन लावल्याचे पाहायला मिळालं होतं. तसंच त्याची तब्येतही बारीक झाली असल्याचे या व्हिडीओमधून दिसले. त्यानंतर आता अभिनेत्याच्या मैत्रिणीने धक्कादायक माहिती दिली आहे

Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Premachi Goshta Marathi Serial

तेजश्री प्रधानच्या अचानक एक्झिटनंतर 'प्रेमाची गोष्ट'च्या नव्या अभिनेत्रीची कामाला सुरुवात, मुक्ताची भूमिका साकारणार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.