रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अंकिता वालावलकरची लगीनघाई! कपडे खरेदीला सुरुवात, बहिणींबरोबर करत आहे जय्यत तयारी

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 10, 2025 | 10:59 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
konkan hearted girl aka Ankita Walawalkar shared a video of her sisters shopping at a saree shop

कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरची लगीनघाई, बहिणींबरोबर सुरु आहे लग्नाची तयारी

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात सहभागी झालेली अंकिता प्रभू वालावलकर कायमच चर्चेत राहिली आहे. सोशल मीडियावर ती ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून लोकप्रिय आहे. अंकिताने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करण्यापूर्वी अंकिताने एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने तिच्या बॉयफ्रेंडबरोबरच्या हाताचा फोटो शेअर केला होता. या पोस्टमुळे अंकिताचा बॉयफ्रेंड कोण असेल याबद्दल उत्सुकता सर्वांनाच लागली होती. त्यानंतर ‘बिग बॉस मराठी’मधून बाहेर येताच तिने बॉयफ्रेंडच्या नावाचा खुलासा केला. संगीतकार कुणाल भगतबरोबर अंकिता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. होणाऱ्या नवऱ्याबद्दल जाहीर केल्यापासूनच अंकिताच्या लग्नाची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. (ankita walawalkar wedding shopping)

अशातच अंकिता तिच्या लग्नाच्या खरेदीच्या तयारीला लागली आहे. अंकिता सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. अशातच सध्या ती लग्नासंबंधित अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहे. अंकिताने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अंकिताच्या दोन्ही बहिणी साडी खरेदी करतानाचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे अंकिता लग्नाआधीच्या बस्ताबांधणीला आपल्या दोन बहिणींबरोबर गेली असल्याचे या व्हिडीओमधून दिसत आहे. या व्हिडीओला तिने नेहा कक्करचे ‘वेडिंग दा सीझन है’ हे खास गाणंही लावलं आहे.   

आणखी वाचा – “पप्पा जाऊन चार वर्षे झाली पण…”, वडिलांच्या आठवणीत रवी जाधव भावुक, म्हणाले, “त्यांची आठवण…”

काही दिवसांपूर्वी तिच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली होती आणि आता तिने लग्नाच्या खरेदीलाही सुरुवात केली आहे. सध्या ती कामातून वेळात वेळ काढत लग्नाची शॉपिंग करताना दिसत आहे. खरेदीचे अनेक व्हिडीओ तिने तिच्या सोशल मीडियाद्वारे पोस्टही केले आहेत. काही दिवसांपूर्वी अंकिताने डीपीदादाबरोबर खरेदी करायला गेल्याचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये अंकिता कपड्यांच्या दुकानात शॉपिंग करताना दिसली होती.

आणखी वाचा – “हे खरंही असू शकतं आणि…” धनश्री वर्माबरोबरच्या नात्याबद्दल युजवेंद्र चहलचे थेट भाष्य, म्हणाला, “खूप वेदना…”

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी ५’मधून बाहेर आल्यापासून अंकिताच्या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा होताना दिसत आहे. तिच्या अनेक चाहत्यांना ती लग्नबंधनात कधी अडकणार यांची उत्सुकता लागून राहिली आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात अंकिता-कुणाल लग्न करणार असल्याच्या चर्चा होत आहेत. त्यामुळे आता त्यांचे अनेक चाहते मंडळी लग्नाची आतुरतेने वाट बघत आहेत.   

Tags: ankita walawalkar sistersankita walawalkar sisters wedding shoppingankita walawalkar wedding shopping
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Deepika Padukone Slams Lt Chairman Sn Subrahmanyan

“मोठ्या पदावर बसलेले…”, L&T चेअरमनच्या ९० तास काम करण्याच्या सल्ल्यावर भडकली दीपिका पदुकोन, म्हणाली, “अशी विधानं…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.