शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

घरी नव्हे तर रुग्णालयातच प्रत्युषा बॅनर्जीचा झालेला मृत्यू, एक्स बॉयफ्रेंडचे अनेक धक्कादायक खुलासे, म्हणाला, “मी हत्या केली असं…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 9, 2025 | 5:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Balika Vadhu fame actress Pratyusha Banerjee death after nine years ex-boyfriend Rahul Raj Singh made a shocking revelation.

'बालिका वधू' फेम प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूच्या नऊ वर्षांनंतर माजी प्रियकर राहुल राज सिंहचा धक्कादायक खुलासा

छोट्या पडद्यावरील ‘बालिका वधू’ या मालिकेतून लोकप्रियता मिळवणारी दिवंगत अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीचं निधन होऊन नऊ वर्ष झाली आहेत. कथितपणे प्रत्युषानं २०१६ मध्ये आत्महत्या केली होती. प्रत्युषाच्या मैत्रिणीने यासाठी प्रत्युषाचा एक्स बॉयफ्रेंड राहुल राज सिंगला जबाबदार ठरवलं होतं. आता नऊ वर्षांनंतर राहुल राज सिंगनं धक्कादायक खुलासा केला आहे आणि काम्या पंजाबीवर गंभीर आरोप केले आहेत. राहुल राज सिंहनं सुभोजीत घोषच्या यूट्युब चॅनलला दिलेल्या एका मुलाखतीत प्रत्युषाच्या कथित आत्महत्येविषयी सांगितलं. त्याशिवाय हे देखील सांगितलं की, अभिनेत्रीच्या निधनासाठी त्याला का जबाबदार ठरवण्यात आलं. (rahul raj singh on pratyusha banerjee death)

प्रत्युषाला हॉस्पिटलमध्ये नेले तेव्हा जिवंत असल्याचा दावा राहुल राजने केला होता. प्रत्युषाचा मृत्यू हॉस्पिटलच्या औपचारिकतेला उशीर झाल्यामुळे झाल्याचा आरोप राहुलने केला आहे. याबद्दल राहुल राज सिंह म्हणाला, “औपचारिकता आणि प्रक्रिया इतकी लांब होती की, प्रत्युषाला प्रवेश मिळण्यासाठी नेहमीपेक्षा थोडा जास्त वेळ लागला आणि या सगळ्यात तिचा मृत्यू झाला. राहुलनं प्रत्युषाची हत्या केली. हेच मी अनेक मीडिया चॅनेलवर पाहिलं आहे”. पुढे त्याने दावा केला की, प्रत्युषावर कोणतंही आर्थिक संकट नव्हतं आणि तिच्याकडे काम देखील होतं.

View this post on Instagram

A post shared by Rahul Raj singh (@rahulrajnaamtosunahoga)

आणखी वाचा – महागडं हॉटेल, रिसॉर्टला न जाता मराठी अभिनेत्याच्या लेकीने वाढदिवसाला गाठलं कोकण, कुटुंबियांसह धमाल, साधेपणाचं कौतुक

राहुल राजनं पुढे काम्या पंजाबीविषयी बोलत सांगितलं की, “काम्यानं प्रत्युषाकडून अडीच लाख रुपये उधार घेतले. मी काम्याला ओळखत सुद्धा नव्हतो. एकदा एका पार्टीत प्रत्युषानं माझी आणि तिची भेट घडवून आणली होती. तेव्हा काम्या पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत होती”. राहुल राजनं पुढे सांगितलं की, “प्रत्युषानं काम्याला जवळवास दोन ते अडीच लाख रुपये दिले होते आणि तिने काम्याला पैसे परत देण्यास सांगितलं होतं. पण काम्यानं सांगितलं की, तिच्याकडे आता काही काम नाही. त्यामुळे ती नंतर पैसे परत देईल”.

आणखी वाचा – Video : रवीना टंडनच्या लेकीचा सेटवर अभ्यास, बोर्डाच्या परीक्षेची करतेय तयारी, नेटकरी भडकून म्हणाले, “दिखावा…”

दरम्यान, प्रत्युषाच्या मृत्यूनंतर तिच्या पालकांनी राहुल राज सिंहविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात राहुलला तुरुंगातही जावे लागले होते. मात्र, नंतर राहुल राज सिंहने आपल्या आयुष्यात नवीन सुरुवात केली आणि लग्न करुन संसाराला सुरुवात केली होती. या प्रकरणात आपल्याला चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आल्याचे राहुल म्हणाला आहे.

Tags: pratyusha banerjeepratyusha banerjee deathrahul raj singh on pratyusha banerjee death
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 fame Dhananjay Powar daughter asking for money funny video viral on social media

Video : डिपीच्या लेकीने हटके स्टाइलने मागितले पैसे, स्वॅग पाहून नेटकऱ्यांनाही हसू आवरेना, व्हिडीओ तुफान व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.