रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पत्नीने पाश्चात्य संस्कृती स्वीकारली नाही म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्याने घेतलेला घटस्फोट, दुसऱ्या बायकोने हाल केले अन्…

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 9, 2025 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bollywood actor Saeed Jaffrey divorced his first wife and later started living in a live-in relationship with a foreign woman.

अभिनेते सईद जाफरी यांचा पहिल्या पत्नीला घटस्फोट, नंतर परदेशी महिलेबरोबर लिव्ह इन रिलेशनशिप

सईद जाफरी हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक अभिनेते आहेत. त्यांनी आजवर १५० हून अधिक ब्रिटिश, अमेरिकन आणि भारतीय चित्रपट केले होते. ब्रिटीश चित्रपट आणि मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारण्याव्यतिरिक्त, सईद हे हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या व्यक्तींपैकी एक होते. सईद यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक जबरदस्त भूमिका साकारल्या. ‘शतरंज के खिलाडी’, ‘चश्मे बद्दूर’, ‘राम तेरी गंगा मैली’ आणि ‘मेहंदी’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी यशाचं शिखर गाठलं. मात्र, त्यांचं वैयक्तिक आयुष्य फारसं चांगलं नव्हतं. सईद जाफरी यांच्या कारकिर्दीची आणि चित्रपटांची तितकी चर्चा झाली नाही तितकी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा झाली. (saeed jaffrey news)

सईद जाफरी यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता आणि नंतर एका परदेशी महिलेबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. मात्र जेव्हा त्यांची पहिली पत्नी प्रसिद्ध व लोकप्रिय झाली, तेव्हा सईद जाफरी यांना त्यांची चूक समजली आणि मग त्यांना आयुष्यभर पश्चाताप होत राहिला. सईद जाफरी व मधुर (पहिली पत्नी) बहादूर एकत्र काम करताना प्रेमात पडले. १९५६ मध्ये सईद जाफरी यांनी मधुरच्या वडिलांना त्यांच्या मुलीचा हात मागितला, पण त्यांनी नकार दिला. त्यावेळी सईद जाफरी ऑल इंडिया रेडिओमध्ये काम करत होते. त्यांनी लगेच नोकरीचा राजीनामा दिला आणि ते अमेरिकेला गेले.  मग १९५८ मध्ये तेथे त्यांचे लग्न झाले. मात्र काही वर्षांनी त्यांच्यात भांडणे सुरु झाली.

आणखी वाचा – महागडं हॉटेल, रिसॉर्टला न जाता मराठी अभिनेत्याच्या लेकीने वाढदिवसाला गाठलं कोकण, कुटुंबियांसह धमाल, साधेपणाचं कौतुक

सईद जाफरी आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांशी इंग्रजीत बोलत असत, तर त्यांची पत्नी शुद्ध हिंदीत बोलत असे. सईद जाफरी यांना ही पद्धत आवडली नाही. यामुळे त्यांच्यात मतभेद होऊ लागले आणि त्यानंतर १९६६ मध्ये पत्नी मधुरला घटस्फोट दिला. पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर सईद जाफरी यांनी विदेशी महिला जेनिफरला डेट करण्यास सुरुवात केली आणि लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. असे म्हटले जाते की, दोघेही जवळपास १० वर्षे एकत्र राहिले आणि नंतर लग्न केले. पण लग्नाच्या काही काळानंतर सईद यांना समजले की, त्यांची दुसरी पत्नी त्यांची काळजी करत नाही. ती फक्त स्वत:चा विचार करत होती. त्यानंतर त्यांना मधुरची कमी जाणवू लागली.

आणखी वाचा – Video : रवीना टंडनच्या लेकीचा सेटवर अभ्यास, बोर्डाच्या परीक्षेची करतेय तयारी, नेटकरी भडकून म्हणाले, “दिखावा…”

घटस्फोटानंतर मधुर यांनी मुलांना भारतात आपल्या आईकडे पाठवलं आणि स्वतः कुकिंगमध्ये करिअर केलं. मधुर यांनीसुद्धा दुसरं लग्न केलं. एक वेळ अशीही आली होती कि सईद यांना त्यांच्या मुलांना भेटायचं होतं पण मधुर यांनी भेटण्यास नकार दिला. त्यामुळे सईद जाफरी पहिल्या पत्नीला आणि मुलांना पुन्हा आपल्या आयुष्यात आणू शकले नाहीत.

Tags: bollywood actor saeed jaffreysaeed jaffreysaeed jaffrey news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Hrithik Roshan And Sussanne Khan Alimony

घटस्फोटानंतर हृतिक रोशनला द्यावी लागली होती ३८० कोटी रुपयांची पोटगी, झालेली वाईट अवस्था, आता एक्स पत्नीबरोबर मैत्री अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.