शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वयाच्या ५३ व्या वर्षीही अविवाहित असण्याच्या प्रश्नांना कंटाळली तब्बू, थेट उत्तर देत म्हणाली, “लोकांना…”

Shamal Sawantby Shamal Sawant
जानेवारी 9, 2025 | 12:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
tabu on wedding

लग्न न करण्याच्या प्रश्नांवरुन भडकली तब्बू

बॉलिवूड अभिनेत्री तब्बू सध्या पुन्हा एकदा खूप चर्चेत आली आहे. ८०-९० च्या दशकामध्ये तिने याने सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. मध्यंतरीच्या काळात ती मनोरंजन क्षेत्रापासून लांब राहिली होती. मात्र नंतर तिने वेबसीरिज व चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा अभिनय करण्यास सुरुवात केली. तब्बू आता ५३ वर्षांची आहे. मात्र अजूनही ती अविवाहित आहे. तब्बूप्रमाणे अनेक बॉलिवूड अभिनेत्री अविवाहित आहेत. मात्र अनेकदा ती लग्न न करण्याच्या प्रश्नांवर सडेतोड उत्तर देताना दिसते. बऱ्याच वेळा ती या प्रश्नांना कंटाळलेलीदेखील दिसते. (tabu on wedding)

काही दिवसांपूर्वी तब्बूला तिच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले. तेव्हा तिने सांगितले की असे प्रश्न कंटाळवाणे वाटत असल्याचे सांगितले. ती मस्करीमध्ये म्हणाली, “माहीत नाही लोकांना माझ्या आयुष्यात वाकून बघायची काय गरज असते ते”. तसेच ‘हिंदुस्थान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्येही ती म्हणाली की, “लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात काहीही अर्थ नाही”. तसेच तिने लोकांना उलट प्रश्न विचारला की, “माझं सायकॉलॉजिकल अनालिसिस का करायचं आहे लोकांना? लग्नाबद्दलचा प्रश्न विचारून काय साध्य करायचं आहे?”.

आणखी वाचा – “गेले काही दिवस खूप कठीण गेले”, घटस्फोट व अफेअरच्या चर्चांवर युजवेंद्र चहलच्या पत्नीचं भाष्य, म्हणाली, “माझ्या चारित्र्याला…”

View this post on Instagram

A post shared by Tabu (@tabutiful)

दरम्यान तब्बू सोशल मीडियावरदेखील अधिक सक्रिय असलेली बघायला मिळते. काही दिवसांपूर्वी तिचे काही फोटो समोर आले होते. यामध्ये तिचा सुंदर असा सिल्क गाऊन दिसून आला होता. यामध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. वयाच्या ५३ व्या वर्षीही तिचं सौंदर्य पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.

आणखी वाचा – “कुमार सानू मला पतीसारखे होते”, गायकाच्या एक्स गर्लफ्रेंडचा मोठा खुलासा, म्हणाली, “एकमेकांच्या जवळ आलो आणि…”

तब्बूच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर,तिचा ‘क्रू’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत राहिला होता. या चित्रपटांमध्ये तिच्या बरोबर करीना कपूर, क्रिती सेनॉन, कपिल शर्मा, दिलजित दोसांझ हे कलाकार दिसून आले होते. आता ती अक्षय कुमारबरोबर ‘भूत बंगला’मध्ये दिसून येणार आहे. अक्षयने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटामध्ये परेश रावल, राजपाल यादव व असरानी हे कलाकार दिसून येणार आहेत. हा चित्रपट २ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.   

Tags: bollywood actressTabuunmarried
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
bollywood actress raveena tandon daughter rasha thadani preparing for her 12th board exams video viral and netizens angry on her

Video : रवीना टंडनच्या लेकीचा सेटवर अभ्यास, बोर्डाच्या परीक्षेची करतेय तयारी, नेटकरी भडकून म्हणाले, “दिखावा…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.