शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 18 च्या ग्रँड फिनाले पूर्वीच विजेत्याचे नाव समोर, कोण ट्रॉफी घरी घेऊन जाणार?

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 8, 2025 | 5:11 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss 18 show winner name revealed before the grand finale

Bigg Boss 18 च्या ग्रँड फिनाले पूर्वीच विजेत्याचे नाव समोर

छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणजे ‘बिग बॉस’. ‘बिग बॉस’चा अठरावा सीझन गेल्या वर्षी ६ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला. तीन माहिने प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर आता लवकरच या शोचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. सलमान खानने नुकत्याच पार पडलेल्या ‘वीकेंड का वार’मध्ये शोच्या ग्रँड फिनालेची तारीख जाहीर केली. येत्या १९ जानेवारी रोजी ‘बिग बॉस १८’चा ग्रँड फिनाले सोहळा पार पडणार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर अखेर आता पुढच्या दोन आठवड्यांत प्रेक्षकांना या शोचा विजेता मिळणार आहे. (bigg boss 18 grand finale)

या शोमध्ये विवियन डिसेना, करणवीर मेहरा, शिल्पा शिरोडकर, रजत दलाल, चुम दरंग, अविनाश मिश्रा, ईशा सिंह, श्रुतिका अर्जुन आणि चाहत पांडे सारखे स्टार्स दिसत आहेत. या शोची बरीच चर्चा आहे. शोच्या विजेत्याबद्दल चाहत्यांनाही उत्सुकता आहे. प्रत्येकाला आपापल्या स्पर्धकाला विजेता बनताना पाहायचे आहे. त्यामुळे अनेक चाहते मंडळी या ग्रँड फिनालेसाठी उत्सुक आहेत. अशातच समीक्षक कमाल आर खान (केआरके) यांनीही ग्रँड फिनालेबाबत एक पोस्ट केली आहे. यामधुन शोचा विजेता कोण असेल? हे सांगितले आहे.

I am really surprised that #BiggBoss contestants are not sure till now that (1) Vivian or (2) Karanveer will win the trophy.🏆 @ColorsTV

— KRK (@kamaalrkhan) January 7, 2025

आणखी वाचा – ‘प्रेमाची गोष्ट’मधून अचानक एक्झिट घेतल्यानंतर तेजश्री प्रधानची निराशाजनक पोस्ट, म्हणाली, “तुम्ही योग्य किंमत व आदर…”

त्याने शेअर केलेल्या पहिल्या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “मला खरोखर आश्चर्य वाटते की, बिग बॉस स्पर्धकांना (०१) विवियन किंवा (०२) करणवीर ट्रॉफी जिंकेल याची अद्याप खात्री नाही”. तर दुसऱ्या पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे की, ‘बिग बॉस १८ च्या टॉप स्पर्धकांबद्दल सांगायचे तर, या यादीत विवियन डिसेना पहिल्या स्थानावर आहे. करण वीर मेहरा दुसऱ्या स्थानावर, तर शिल्पा शिरोडकर तिसऱ्या स्थानावर आहे. कारण ब्रँड केआरकेने ते सांगितले आहे”.

आणखी वाचा – आभ्याच्या बोलण्यामुळे रेश्मा नाराज, केवडाप्रती असलेलं प्रेम पाहवेना, नात्याला कोणतं नवं वळण मिळणार?

दरम्यान, Ormax मीडियाच्या रिपोर्टनुसार, गेल्या आठवड्यात रजत दलाल यांना प्रथम क्रमांक मिळाला आहे. तर विवियन डिसेनाला क्रमांक दोन आणि करणवीर मेहराला तिसरा क्रमांक मिळाला आहे. आता ‘बिग बॉस १८’चा विजेता कोण होणार? हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना १९ जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. जिओ सिनेमा आणि कलर्स टीव्हीवर शोचा ग्रँड फिनाले प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
kangana on oscar awards

"भारतातील घाण दाखवणाऱ्या चित्रपटाचीच ऑस्करला निवड", कंगना रणौतचा मोठा दावा, म्हणाली, "'स्लमडॉग मिलेनियर'ही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.