रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कियारा अडवाणी रुग्णालयात भरती?, अभिनेत्रीच्या टीमने सांगितलं सत्य, नेमकं काय झालं?

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 4, 2025 | 3:17 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bollywood actress Kiara Advani team clarified the news that she was admitted to a hospital in Mumbai on Saturday morning

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी रुग्णालयात होती दाखल, टीमकडून सत्य आलं समोर

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या तिच्या आगामी ‘गेम चेंजर’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती राम चरणबरोबर अभिनय करताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सगळ्या दरम्यान, कियारा अडवाणीला रुग्णालयात दाखल केल्याची बातमी नुकतीच पसरली आहे. त्यावर आता अभिनेत्रीच्या टीमने संपूर्ण सत्य सांगितले आहे. अभिनेत्री कियारा अडवाणी रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी नुकतीच सोशल मीडियावर पसरली. शनिवारी सकाळी मुंबईतील रुग्णालयात तिला दाखल करण्यात आल्याचे वृत्त समोर येताच तिच्या चाहत्यांनी अभिनेत्रीबद्दल चिंता व्यक्त केली. यावर आता तिच्या टीमकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. (kiara advani admitted)

अभिनेत्री आज मुंबईत तिच्या आगामी ‘गेम चेंजर’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच आणि पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार होती. मात्र,  ती या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकली नाही. यानंतर बातम्या येऊ लागल्या की, कियाराला आज सकाळीच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, तिला रुग्णालयात दाखल करण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, अभिनेत्रीच्या टीमने या बातम्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्रीच्या टीमने सांगितले की कियाराला रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही.

View this post on Instagram

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

आणखी वाचा – क्रिकेटर युजवेंद्र चहल व धनश्री वर्मा घटस्फोट घेणार?, नक्की दोघांमधील वाद काय?, चर्चांना उधाण

कियाराच्या टीमने सांगितले की, अभिनेत्री सतत काम करत असल्याने तिला थकवा जाणवला  आणि या थकव्यामुळे तिला विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे अभिनेत्री विश्रांती घेत आहे. ती विश्रांती घेत असल्यामुळे ‘गेम चेंजर’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच आणि पत्रकार परिषदेला ती उपस्थित राहिली नाही. कियारा गैरहजर राहिल्यानंतर शोचा निवेदक नितीनने ती हॉस्पिटलाइज्ड असल्याचं सांगितलं आणि यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता.

आणखी वाचा – अखेर प्रतीक्षा संपली! ‘दहावी-अ’ वेबसीरिज ‘या’ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार, उत्सुकता वाढली

दरम्यान, ‘गेम चेंजर’च्या मुंबईतील कार्यक्रमात अभिनेता राम चरण, एस. जे. सुर्या, निर्माता दिल राजू, अनिल थडानी आणि चित्रपटाची टीम हजर होती. या चित्रपटात राम चरणसह सुनील, नासिर, शुभलेखा सुधाकर, प्रकाश राज, प्रवीणा आणि मुरली शर्मा हे कलाकारही दिसणार आहेत. येत्या १० जानेवारी जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Tags: kiara advani admittedkiara advani admitted newskiara advani bollywood actress
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
lakhat ek amcha dada serial update boy shooting an offensive video audience expressed their anger after seeing the scene

'लाखात एक…'मध्ये लहान मुलगा आक्षेपार्ह व्हिडीओ शूट करतानाचा सीन, प्रेक्षक भडकले, म्हणाले, "स्त्रियांवर अत्याचार, वाईट वळण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.