मराठी मनोरंजनविश्वातील गोड अभिनेत्री जुई गडकरी सध्या छोट्या पडद्यावरील ‘ठरलं तर मग’ मालिकेत दिसत आहे. या मालिकेतून जुईने बऱ्याच वर्षांनी टीव्हीसृष्टीत पदार्पण केलेलं असून तिच्या भूमिकेचे प्रेक्षक कौतुक करत आहे. मनोरंजनविश्वात सक्रिय असणारी जुई फिटनेस फिक्र असण्याबरोबर फिरण्याची प्रचंड आवड आहे. शिवाय सामाजिक कार्यातही ती नेहमीच पुढे असते. (jui gadkari appeals)
तीन दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. अनेक ग्रामस्थ ढिगाऱ्याखाली अडकले असून गेल्या दोन दिवसांपासून गावात मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरु आहे. विशेष म्हणजे अभिनेत्री जुई गडकरी वर्षभरापूर्वी याच गावाजवळ असलेल्या इर्शाळगडावर गेली होती, तेव्हा तिने इर्शाळवाडीतील स्थानिक गावकऱ्यांच्या घरी जाऊन तिथल्या जेवणाचा आस्वाद घेतला होता.
त्यामुळे ही दुर्घटना जेव्हा घडली, तेव्हा तिने यासंदर्भात एक पोस्ट शेअर करत दुःख व्यक्त केले. या पोस्टनंतर आता जुईने सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर केली असून ज्यात ती सर्वांना इर्शाळवाडीतील ग्रामस्थांना मदत करण्याचे आवाहन केले.
पहा जुईने कशाप्रकारे केले आवाहन (jui gadkari appeal to fans for help of irshalwadi villagers)
जुईने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट केली असून ज्यात तिने “ईरशाळवाडीसाठी मदत पाठवायची असल्यास कृपया मला मेसेज करा. पंचे, चादरी, औषधे, कपडे, चपला, जेवण, इ. जीवनावश्यक वस्तु तिथपर्यंत माझ्या टीमकडुन पोचवल्या जातील..” अशी पोस्ट करत आपल्या चाहत्यांकडून मदतीसाठीचे आवाहन केले. (jui gadkari appeal to fans for help of irshalwadi villagers)

याआधीच्या पोस्टमध्ये जुईने इर्शाळवाडीतील काही आठवणी ताज्या केल्या होत्या. तेव्हा तिने तिथल्या समस्येसोबत तिथल्या गावकऱ्यांचे कौतुक केले होते. शिवाय इर्शाळगडावरील ट्रेकिंग व तिथल्या रस्त्यांवर फिरतानाचा अनुभवही सर्वांसमोर शेअर केला.

हे देखील वाचा : केतकीच्या Opposite दिसणार, रोमान्स, ऍक्शनचा पॉवरपॅक असा तडफदार सुपरस्टार, तुम्ही ओळखलंत का कोण आहे हा अभिनेता?