बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘या’ पाच कारणांसाठी ऋता दुर्गुळे-ललित प्रभाकरचा ‘आरपार’ सिनेमा नक्की पाहा, केवळ अभिनयच नव्हेतर…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 12, 2025 | 5:55 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
5 Reasons to watch aarpaar

'या' पाच कारणांसाठी ऋता दुर्गुळे-ललित प्रभाकरचा 'आरपार' सिनेमा नक्की पाहा, केवळ अभिनयच नव्हेतर…

5 Reasons to watch aarpaar : सध्या मराठी चित्रपटांची सिनेमागृहांमध्ये रांग लागली आहे. अशातच ऋता दुर्गुळे आणि ललित प्रभाकरचा आरपार हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनातून आरपार व्हायला सज्ज झाला आहे. १२ सप्टेंबरला हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. अर्थात ट्रेलर, पोस्टर, टिझर आणि गाण्यांनी चित्रपटाची उत्सुकता वाढविली होतीच पण हो सिनेमा चित्रपटगृहात आलाय आणि साऱ्यांचं मन जिंकतोय. तुम्ही अजून पाहिला नाही का हा सिनेमा. चिंता नसावी, हा सिनेमा प्रेक्षकांनी का पाहावा याचे टॉप ५ रिझन्स मी आज तुम्हाला सांगणार आहे…चला तर मग सुरुवात करूया.

ललित-ऋता अभिनय
ललित आणि ऋताचा वाढदिवस हा १२ सप्टेंबरला आहे आणि दोघांच्या चाहत्यांसाठी ही पर्वणीच म्हणायला हवी, हा चित्रपट त्यांच्या प्रत्येक चाहत्याने वाढदिवसाची भेट म्हणून नक्कीच पाहायला हवा. याशिवाय बोलायचं झालं तर दोघांचा अभिनय अर्थात वाखाणण्याजोगा आहे. आरपारमध्ये त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री इतकी भन्नाट दाखविली आहे की ते खरंच रिअल कपल आहेत की काय असं वाटत आहे. त्यांच्यातील प्रेम, भांडण या सगळ्या गोष्टी खऱ्याच आहेत असं चित्रपट पाहताना सतत वाटत होतं. यांत अजून एक मुद्दा ऍड करावा वाटतोय तो म्हणजे ललित चित्रपटांच्या बाबतीत म्हणजेच चित्रपटाची निवड करण्यात तो खूप choosy आहे. तर त्याने हा चित्रपट निवडला आहे याचा अर्थ हाच की या चित्रपटात नक्कीच काहीतरी खास बात आहे. ललितच या चित्रपटातील बॉडी ट्रान्सफरर्मेशन पाहण्यासारखं आहे तर ऋताचा ग्लॅमरस चेहरा आजही या चित्रपटात तसाच आहे. तिच्या चेहऱ्यावरची निरागसता मोहक वाटतेय. शूट करताना दोन्ही कलाकारांना फिझिकल आव्हान होती ती त्यांनी अगदी अचूक पार पाडली आहेत.

आणखी वाचा – “तिने विवाहित पुरुषांसोबत…”, ‘त्या’ वक्तव्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर कुमार सानूचा लेक भडकला, सहा वर्ष अफेअर होतं आणि…

संगीत
हा चित्रपट पाहण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे संगीत. बाप संगीत आहे. दिग्गज गायकांची फौज या चित्रपटातील गाण्यांना लाभली आहे. शंकर महादेवन, अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, वैशाली सामंत, आनंदी जोशी, अंकिता जोशी, गुलराज सिंग यांनी चित्रपटातील गाण्यांना आवाज दिला आहे. गुलराज सिंग यांचं संगीत म्हणजे सोने पे सुहेगा. गाण्यांसाठी हा चित्रपट खरंच पाहावा. या चित्रपटात एक जागरण गोंधळ हे गाणं आहे. सुरु झालं तेव्हा अंगावर काटा आला. असा गोंधळ आतापर्यंत मी तरी ऐकला नाही. डॉ. गणेश चंदनशिवे यांच्या दमदार आवाजात स्वरबद्ध झालेलं हे गोंधळ गाणं साऱ्यांना थक्क करणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Hruta Durgule (@hruta12)

दिग्दर्शन

चित्रपटात काहीतरी दाखवायचं म्हणून थुकरट न दाखवता mature लव्हस्टोरी दाखविण्यात आली आहे. आजवर आपण पाहत आलोय की अनेकदा दोन प्रेमीयुगुल एकत्र येतात आणि प्रेम होतं किंवा त्यांच्यात दुरावा येतो आणि ती कथा संपते. हा तोच तोच रटाळपणा या सिनेमाच्या कथानकात नाही आहे. गौरव पतकी यांनी अगदी विचारपूर्वक अशी लव्हस्टोरी लिहिली आहे आणि ती पडद्यावर मांडली आहे. पडद्यावर दिसणारा प्रत्येक कलाकार एका चौकटीत दिग्दर्शकाने बांधला आहे.

आणखी वाचा – “हा पूर्णविराम नाही”, मालिकेच्या निरोपावर सुप्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, “या माणसांशी…”

संवाद
प्रत्येक चित्रपटातील संवाद हे लक्षवेधी असतात. त्याचप्रमाणे या चित्रपटातील संवादही खूप स्पष्ट आणि ऐकत राहण्यासारखे आहेत. ‘प्रेमात अधलं मधलं काही नसतं’ आणि ‘प्रेमात वेड लावायची ताकद असते फक्त पार्टनर चांगला मिळायला हवा’ अशा काही ओळी चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. राग, प्रेम याची भाषा अगदी उत्तमरीत्या आणि सहज सोपी असल्याने प्रत्येकाला कळणारी आहे. तरुण पिढीच्या जवळचे हे संवाद आहेत असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

सिनेमॅटोग्राफी

एखाद्याने पाहताना ती स्क्रीन इतकी नीटनेटकी आणि सुंदर दिसावी यासाठी प्रत्येक डीओपी मेहनत घेतो. दिग्दर्शकाच्या नजरेतून जरी हा चित्रपट शूट होणार असला तरी डीओपीचे प्रामाणिक मत यांत अग्रस्थानी आहे. आरपारच्या डीओपीने प्रत्येक सीन अगदी larger then life ठेवला आहे, चित्रपटात शेवटी एक ललित ऋताचा सीन आहे ज्यात ते एका उंच डोंगरावर पाठमोरे उभे असतात, तो सीन ज्या पद्धतींने त्यांनी शूट केलाय लाजवाब. कलाकारांचे भाव इतके अचूक टिपले आहेत की पाहताच मन भरून येतंय.

Tags: 5 reasons to watch movieaarpaaraarpaar marathi movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
priya marathe story

प्रिया मराठेला जाऊन १३ दिवस…; अभिनेत्रीचा 'तो' फोटो पाहून साऱ्यांचे डोळे पाणावले, कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.