Priya Marathe Death : मराठी मनोरंजनविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे यांचं वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या अचानक निधनाच्या समोर आलेल्या बातमीने संपूर्ण सिनेविश्व हादरले. प्रिया ही केवळ यशस्वी अभिनेत्री नव्हती, तर तिची खासगी आयुष्यातील संघर्ष आणि मेहनतही तितकीच प्रेरणादायी होती. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने संपूर्ण मनोरंजनविश्व हळहळून गेलं. प्रिया मराठे यांनी अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. सुस्वभावी, निरागस, मृदुभाषी अशी प्रियाची ओळख होती. आजवर प्रियाने केलेल्या अभिनयाला प्रत्येक चाहत्याने, प्रेक्षकांनी दाद दिली आहे.
अनेक मराठी मालिकांमधून लोकप्रिय झालेल्या प्रियाला ‘पवित्र रिश्ता’ या हिंदी मालिकेमुळे विशेष ओळख मिळाली. सिनेविश्वातील कलाकारांना आणि खासकरुन या मालिकेतील कलाकारांना प्रिया यांची आठवण येताच त्यांचे डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत. आज प्रियाला जाऊन १३ दिवस झाले आहेत. त्यांच्या मृत आत्म्यास शांती लाभावी म्हणून एक विधी त्यांच्या राहत्या घरी पार पडला. याचा भावुक करणारा फोटो अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

‘पवित्र रिश्ता’ मालिकेपासून प्रिया आणि प्रार्थना बेहरे यांची घट्ट मैत्री होती. संघर्षाच्या काळातही त्यांनी एकमेकींना साथ दिली होती.प्रियाच्या अंत्यसंस्काराच्या वेळी प्रार्थना ढसाढसा रडताना दिसली. त्यावेळी तिने आपल्या मनातील भावना आणि आठवणींना उजाळा दिला होता. तसेच आज प्रियाच्या १३ दिवसांच्या कार्य विधीसाठीही प्रार्थना उपस्थित होती. तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर या विधीचा फोटो शेअर करत “Miss you, वेडे ” असं लिहिलं.
आणखी वाचा – ‘या’ पाच कारणांसाठी ऋता दुर्गुळे-ललित प्रभाकरचा ‘आरपार’ सिनेमा नक्की पाहा, केवळ अभिनयच नव्हेतर…
प्रियाने ‘या सुखांनो या’, ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथं मी’, ‘संभाजी’ ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण, ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ या गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. ‘पवित्रा रिश्ता’, ‘उतरन’, ‘कसम से’, ‘बड़े अच्छे लगते है’ या हिंदी मालिकांमुळे तिचा हिंदी कलाविश्वात ही दबदबा निर्माण झाला होता.





