शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘होम मिनिस्टर’ला १९ वर्ष पूर्ण, आदेश बांदेकरांनी मानले प्रेक्षकांचे आभार, म्हणाले, “मागे वळून बघताना…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
सप्टेंबर 15, 2023 | 9:24 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Home Minister Show completes 19 Years

'होम मिनिस्टर' कार्यक्रमाला झाली १९ वर्ष पूर्ण, आदेश बांदेकरांनी इंस्टाग्राम लाईव्हद्वारे मानले प्रेक्षकांचे आभार, म्हणाले, "मागे वळून बघताना..."

महाराष्ट्रातील लाखो वहिनींचा हक्काचा आणि लोकप्रिय कार्यक्रम ‘होम मिनिस्टर’ या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाने नुकतेच १९ वर्ष पूर्ण करून २०व्या वर्षात पदार्पण केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांनी ‘दार उघड बये दार उघड’ म्हणत महाराष्ट्रातील तमाम वहिनींना बोलतं केलं. त्यांच्यासोबत विविध खेळ खेळत बक्षिसांच्या रूपात वहिनींचा सन्मान केला. यामुळेच हा कार्यक्रम तमाम महिलावर्गाच्या जवळचा बनला असून त्यांच्या प्रेमाखातर आज या कार्यक्रमाने १९ वर्ष पूर्ण केली आहे. (Home Minister Show completes 19 Years)

‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाला १९ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर हे नुकतेच इंस्टाग्राम लाईव्हद्वारे प्रेक्षकांसमोर आले होते. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना कार्यक्रमावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम वहिनींचे व प्रेक्षकांचे आभार मानले. तसेच त्यांना या कार्यक्रमाबद्दल काय वाटते? हेदेखील त्यांनी सांगितले.

आदेश बांदेकर म्हणाले, “होम मिनिस्टर या कार्यक्रमाला १९ वर्ष पूर्ण होतात आणि २० व्या वर्षात आपण पदार्पण करतोय, हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. साधारण आजपासून बरोबर १९ वर्षांपूर्वी १३ सप्टेंबरला कार्यक्रमाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता आणि तिथून हा प्रवास सुरु झाला. मागे वळून बघताना जवळपास ६००० भाग झाले, याचा मला अतिशय अभिमान वाटतो. जगाच्या नकाशावर सोमवार ते शनिवार आनंद देणारा कार्यक्रम आपल्या प्रत्येकाने त्याचा स्वीकार केला.”

हे देखील वाचा – “गणपतीच्या मंडपात पत्त्यांचे डाव अन्…”, मिलिंद गवळींचं सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले, “मुलं दारू पिऊन…”

View this post on Instagram

A post shared by Aadesh Bandekar (@aadesh_bandekar)

“घराघरातील आई, बहिण, माऊलींचा सन्मान करत तसेच आनंदाची उधळण करत, घरातील टेन्शन काही काळ नाहीसा करणारा हा कार्यक्रम करता आला, यामुळे मला छान वाटलं. असंच तुमचं प्रेम कायम ठेवा. होम मिनिस्टर कार्यक्रमामुळे लाखो कुटुंबांनी मला आशीर्वाद दिला. लहान मुलांपासून आजी-आजोबांपर्यंत तुम्ही दिलेलं प्रेम आणि आशीर्वाद हे मला कायम समृद्ध करणारा होता. या निमित्ताने मी माझ्या कुटुंबाला सुचित्रा, सोहम आणि माझे वडील यांना मी धन्यवाद म्हणेन, की त्यांनी मला कायमच प्रोत्साहन दिलं. घराघरात जाऊन इतका प्रवास करताना त्यांनी मला कधीच नको म्हटलं नाही. त्याच आशीर्वादाच्या जोरावर आपण हे २०वं वर्षही साजर करुया”, असे आदेश बांदेकर म्हणाले.

हे देखील वाचा – “पटलं नाही तर…”, ‘बम्बई मेरी जान’ वेबसीरिजला मनसेचा इशारा, अमेय खोपकर म्हणाले, “मुंबई ऐवजी ‘बम्बई’ वापरण्याची…”

छोट्या पडद्यावरील ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाने गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आले आहे. कार्यक्रमाचे तब्बल ६ हजाराहून अधिक भाग झाले आहेत. कार्यक्रमाच्या यशामागे आदेश बांदेकर यांचे सूत्रसंचालन व कार्यक्रमाच्या संपूर्ण टीमचे श्रेय आहे.

Tags: Aadesh Bandekarhome ministerzee marathi
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Tejashri Pradhan shared a post

“आपल्या घरातलं माणूस…”, अडीच वर्षानंतर मालिकेमध्ये परतल्यानंतर तेजश्री प्रधानची पोस्ट, म्हणाली, “तुमच्यातलं कोणीतरी…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.