छोट्या पडद्यावरील मालिका म्हणजे प्रेक्षकांचा जिव्हाळ्याचा विषय. पण गेल्या काही महिन्यांमध्ये काही लोकप्रिय मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. ‘नवा गडी नवं राज्य’, ’३६ गुणी जोडी’ यांसारख्या लोकप्रिय मालिका बंद झाल्या. आता झी मराठी वाहिनीवरील आणखी एक मालिका बंद होणार आहे. प्रेक्षकांमध्येही याबाबत नाराजीचा सूर आहे. पण आता ही मालिका शेवटच्या टप्प्यावर आहे. ती मालिका म्हणजे ‘तू चाल पुढं’. ‘तू चाल पुढं’ला आजवर प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. आता या मालिकेचं कथानक शेवटाकडे आहे. या मालिकेमधीलच एका अभिनेत्रीने याबाबात माहिती दिली. (Dhanashri Kadgaonkar On Instagram)
एक गृहिणी तिच्या करिअरमध्ये काहीतरी करु इच्छिते. आपलं ध्येय गाठण्यासाठी तसेच संसार आर्थिक दृष्ट्याही सुखाचा व्हावा म्हणून घराबाहेर पडते. त्यादरम्यान नेमकं काय काय घडतं? याभोवती या मालिकेचं कथानक आहे. दीपा परब या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. तिने साकारलेलं अश्विनी हे पात्र घराघरांत पोहोचलं. आता ‘तू चाल पुढं’मध्ये शिल्पी हे पात्र साकारणारी अभिनेत्री धनश्री काडगांवकरने मालिका संपणार असल्याचं इन्स्टाग्रामद्वारे सांगितलं आहे.

आणखी वाचा – “बिकिनी घाल”, बायकोला विचित्र सल्ला देणाऱ्यावर भडकला सिद्धार्थ चांदेकर, म्हणाला, “तुमचे अहो घरी तुम्हाला…”
धनश्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे मालिकेच्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये धनश्री सोफ्यावर बसलेली दिसत आहे. तिने व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “’तू चाल पुढं’च्या शूटिंगचे शेवटचे काही दिवस”. तिच्या या व्हिडीओवरुन मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समजून येतं. विशेष म्हणजे मालिकेचं कथानक रंजक वळवणारा असताना हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

दीपा परब, वैष्णवी कल्याणकर, देवेंद्र दोडके, धनश्री काडगांवकर आदी कलाकारांच्या ‘तू चाल पुढं’मधील भूमिका विशेष गाजल्या. प्रेक्षकांनी या मालिकेतील कलाकारांवर भरभरुन प्रेम केलं. आता मालिकेचा शेवट नक्की कसा असणार?, कथानकामध्ये शेवटच्या दिवसांमध्ये कोणतं नवं वळण येणार? हे पाहणं रंजक ठरणार आहे.