शनिवार, मे 10, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : बाजूला धरण, निसर्गरम्य वातावरण; असा आहे ‘पारू’मधील किर्लोस्कर वाडा, पहा कॅमेऱ्यामागील दृश्य

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 18, 2025 | 6:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Paaru Set Safar

बाजूला धरण, निसर्गरम्य वातावरण; असा आहे 'पारू'मधील किर्लोस्कर वाडा, पहा कॅमेऱ्यामागील दृश्य

Paaru Set Safar : ‘झी मराठी’ वाहिनीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. यापैकी ‘पारू’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. सध्या मालिकेचं चित्रीकरण हे सातारा येथे सुरु असलेलं पाहायला मिळत आहे. त्यामुळे मालिकेच्या चित्रीकरणानिमित्त कलाकार मंडळी घरापासून दुर राहून त्यांच्या कामाला प्राधान्य देत आहेत. मालिकेच्या सेटची सफर नुकत्याच एका व्हिडीओमधून समोर आली. ही सफर पारू म्हणजेच शरयू सोनावणेने करुन दिली. त्यामुळे किर्लोस्करांचा बंगला नेमका कसा आहे हे या व्हिडीओद्वारे पाहायला मिळालं. मालिका सुरु झाली तेव्हापासून किर्लोस्कर बंगला अनेकांच्या पसंतीस पडत होता. अखेर या बंगल्याची सफर समोर आली आहे.

‘पारू’ मालिकेच्या सेटची झलक ‘इट्स मज्जा मराठी’च्या युट्युब चॅनेल वरुन पाहायला मिळत आहे. किर्लोस्कर बंगल्याच्या एका बाजूला डोंगर, आणि एका बाजूला उरमोडी धरण आहे. तर बंगल्याचे रक्षक जॉर्डन व दुश्मन यांचीही पारूने ओळख करुन दिली. भव्य हॉल, अहिल्यादेवींची बसायची जागा, स्वयंपाक घर, आणि मालिकेतील सर्व सदस्यांच्या खोल्या पाहायला मिळत आहेत. भव्य अशा हॉलमध्ये त्यांचं चित्रीकरण होत असतं, सुंदर सोफा, त्यावर रंगीबेरंगी कुशन वर खोल्यांकडे चढून जायला असलेले जिने या सर्व गोष्टींनी या किर्लोस्कर बंगल्याच्या हॉलची शोभा वाढविली आहे. तर हॉलच्या बाजूला अहिल्यादेवी घरातल्या सदस्यांबरोबर गप्पा मारायला बसतात, वा चर्चा करायला बसतात ती जागा आहे.

आणखी वाचा – Video : प्रथमेश लघाटेसह त्याचे सासू-सासरेही भजनात दंग, ढोलकी वाजवत दत्तगुरुंच्या नावाचा जप, सुंदर व्हिडीओ समोर

किर्लोस्करांचं स्वयंपाकघर ही पारूची आवडती जागा आहे. त्यांच्या स्वयंपाकघराचा ताबा हा पारुजवळ आहे. स्वयंपाक घरातील मॉड्युलर किचन व उत्तम मांडणी नेहमीच लक्षवेधी राहिली आहे. तर अहिल्यादेवी किर्लोस्करांच्या खोलीत असणार पुस्तकांचं भांडार खूप खास आहे. अनेकदा अहिल्यादेवी त्यांच्या खुर्चीत बसून पुस्तक वाचताना दिसतात. तर एका बाजूला प्रीतम व आदित्य यांना मिळालेल्या ट्रॉफी आहेत. या खोलीची बाल्कनी खूप सुंदर आहे. कारण या बाल्कनीमधून धरणाचं सुंदर असं दृश्य पाहायला मिळतं. तर आदित्यच्या रुमचीही झलक पाहायला मिळाली.

आणखी वाचा – Video : छोटा पुढारीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून डीपीने उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत म्हणाला, “डबिंगचे क्लासेस कुठे लावलात?”

किर्लोस्करांच्या बंगल्याच्या बाहेर असणारी खूप मोठी ऐसपैस जागा, बाग खूप सुंदर आहे. या बंगल्याची खासियत म्हणजे बंगल्यात बाहेरूनही कोणत्याही खोलीत जाता येतं. बंगल्याच्या आवारात खूप मोठं असं स्विमिंग पूलही पाहायला मिळत आहे. बंगल्याच्या अवती-झाडं-झुडूप, डोंगर पाहायला मिळत आहेत. निसर्गाच्या कुशीत असलेला हा किर्लोस्कर बंगला भव्य आणि लक्षवेधी आहे.

Tags: marathi malikapaaru setPaaru Set Safar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

akshay kelkar wedding
Entertainment

सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, शाही विवाहसोहळ्याची झलक समोर, लूकची जोरदार चर्चा

मे 10, 2025 | 11:26 am
Pawandeep Rajan  Health
Entertainment

अपघातानंतर पवनदीपवर पुन्हा शस्त्रक्रिया, आठ तास सुरु होतं ऑपरेशन, आता परिस्थिती अशी की…

मे 10, 2025 | 10:48 am
Akshay Kelkar Wedding
Entertainment

शुभमंगल सावधान! ‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नबंधनात, लग्नातील पहिला फोटो समोर

मे 9, 2025 | 6:08 pm
Aly Goni Viral Post
Entertainment

“जम्मूमध्ये माझं कुटुंब हल्ले सहन करतायत”, भारत-पाकमधील वाढत्या तणावामुळे प्रसिद्ध अभिनेता काळजीत, सांगितली सत्य परिस्थिती…

मे 9, 2025 | 5:35 pm
Next Post
Nivedita Saraf talked about Ashok saraf sister's reaction on her serial

सासरच्या मंडळींचं निवेदिता सराफांकडून तोंडभरुन कौतुक, नणंदबाईंबद्दलही झाल्या व्यक्त, म्हणाल्या, "रोज मालिता बघतात आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.