ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्याबरोबरच निवेदिता सराफ यांनीही कलाक्षेत्राला मोठं योगदान दिलं आहे. निवेदिता सराफ यांनी गेली अनेक वर्ष विविध नाटकं, मालिका, चित्रपटांतून प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या सहजसुंदर अभिनयाने त्यांनी त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. चित्रपट व नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या निवेदिता सराफ या नुकत्याच छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मोठ्या ब्रेकनंतर त्यांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन केले असून त्यांची मालिका ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ ही प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. (Nivedita Saraf on Ashok Saraf Sisters reaction)
निवेदिता यांच्या ‘आई आणि बाबा रिटायर होत आहे’ या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अनेक जण या मालिकेचे कौतुक करत आहेत. मालिकेची कथा, कलाकारांचा अभिनय या सर्वांना प्रेक्षकांकडून दाद मिळत आहे. अशातच निवेदिता यांनी आपल्या कामाचे नणंद व जाउबाईंनाही कौतुक असल्याचे सांगितले आहे. ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत निवेदिता यांनी त्यांच्या नणंदा मालिका बघून प्रतिक्रिया देत असल्याचे सांगितलं. तसंच निवेदिता यांनी नणंद व जाउबाईंबरोबरच्या खास नात्यावरही भाष्य केलं.
आणखी वाचा – “मला तो समलिंगी वाटला होता”, फराह खानचं नवऱ्याबद्दल मोठं भाष्य, म्हणाली, “२० वर्षांत कधीही…”
यावेळी निवेदिता यांनी असं म्हटलं की, “मी खूप भाग्यवान आहे की, माझं संपूर्ण सराफ कुटुंब खूप छान आहे. आमच्या आई-बाबांनंतर आता माझ्या मोठ्या नणंद आहेत. त्या परदेशी असतात. पण माझ्या मालिकेचा प्रत्येक भाग त्या आवर्जून बघतात. तसंच माझ्या मधल्या नणंद मंगला सुखटणकर, माझं प्रत्येक काम बघतात आणि फोन करुन आवर्जून माझ्या कामाबद्दल सांगतात. दुर्दैवाने माझ्या धाकट्या नणंद आता या जगात नाहीत. पण मोठ्या नणंद या अगदी आईसारख्या आहेत. त्यांच्या इतकी निस्वार्थी व्यक्ती मी बघितली नाही”.
आणखी वाचा – नवरी नटली! सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची लगीनघाई, कुटुंबियांबरोबर हटके डान्स, व्हिडीओ व्हायरल
यापुढे निवेदिता यांनी जाउबाईबद्दल असं म्हटलं की, “माझी जाऊ स्मिता सराफ सुद्धा आहेत. त्या माझ्या जाऊ असल्या तरी आम्ही दोघी खूप चांगल्या मैत्रीणी आहोत. आमची एकमेकींची खूप चांगली मैत्री आहे. काही नाती तुमच्या आयुष्यात येतात, तर त्या नात्यापेक्षा माणूस म्हणून त्या व्यक्ती आशिक भावतात. तसंच आमचं सराफ कुटुंब आहे. या सगळ्यात आता आमच्या सूनाही आल्या आहेत आणि त्याही अतिशय कर्तबगार आहेत. एक सीए आहे तर दुसरी नेटफ्लिक्स मध्ये चांगल्या पदावर आहे”.