Mugdha Vaishampayan And Prathamesh Laghate : मराठी मनोरंजन क्षेत्रातील मुग्धा वैशपायन व प्रथमेश लघाटे ही लोकप्रिय जोडी आहे. प्रथमेश व मुग्धा यांच्या मधुर आवाजाने सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात दोघांचाही मोठा चाहतावर्ग आहे. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या लोकप्रिय गाण्याच्या शोमधून ही जोडी प्रसिद्धी झोतात आली. सोशल मिडियावर चर्चेत असणाऱ्या लोकप्रिय कपलच्या यादीत या एका जोडीचं नाव आवर्जून घेतलं जातं. मुग्धा व प्रथमेश हे त्यांच्या लग्नानंतर बरेच चर्चेत असलेले पाहायला मिळाले. सोशल मिडियावर ही जोडी विशेष सक्रिय असलेली पाहायला मिळते. नेहमीच ते दोघेही सोशल मीडियावरुन काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात.
आपल्या गायनाने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी ही जोडी सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अनेकदा हे दोघे त्यांच्या गायनाच्या कार्यक्रमाची माहिती, गाण्याचे व्हिडीओ किंवा अगदी त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील घडामोडी शेअर करत असतात. मुग्धा व प्रथमेश यांचा सध्या सुखी संसार सुरु असलेला पाहायला मिळतोय. प्रथमेश हा मूळचा आरवली येथील आहे. कोकणातील आरवली हे त्याच गाव आहे. कामातून ब्रेक घेत तो व मुग्धा अनेकदा त्यांच्या गावी जात असतात.
आणखी वाचा – सैफ अली खानच्या हल्ल्यामागे अंडरवर्ल्डचा हात?, गृहमंत्री नक्की काय म्हणाले?, मोठी माहिती समोर
प्रथमेश व मुग्धा आता पुन्हा एकदा त्यांच्या कोकणातल्या घरी पोहोचले आहेत. यावेळी ते दोघेच गेले नसून त्यांच्याबरोबर मुग्धाचे आई-वडीलही लेकीच्या सासरी गेले आहेत. काल गुरुवारनिमित्त प्रथमेशच्या गावच्या घरी खास भजन ठेवलं होतं. यावेळी मुग्धा, प्रथमेशसह तिचे आई-बाबाही या भक्तीत व भजनात तल्लीन झालेले पाहायला मिळाले. मुग्धाने या भजनसेवेचा व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आहे. यामध्ये प्रथमेश तबला वादन करताना दिसत आहे.
मुग्धा व प्रथमेश केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात गायनसेवा करत असतात. ‘सारेगमप लिट्ल चॅम्प्स’ या लोकप्रिय कार्यक्रमातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या कार्यक्रमापासूनच मुग्धा व प्रथमेश यांचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. केवळ महाराष्ट्रातचं नव्हे तर संपूर्ण देशभरात दोघांचे अनेक चाहते आहेत. अनेकदा ही जोडी कामाव्यतिरिक्त अनेक ठिकाणांना भेट देत फिरताना दिसते.