शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘झी मराठी’ वाहिनीवर सुरु होतेय नवी मालिका ‘लक्ष्मी निवास’, हर्षदा खानविलकर व तुषार दळवी मुख्य भूमिकेत, पहिला प्रोमो समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 27, 2024 | 9:00 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Zee Marathi Laxmi Niwas

'झी मराठी' वाहिनीवर सुरु होतेय नवी मालिका 'लक्ष्मी निवास', हर्षदा खानविलकर व तुषार दळवी मुख्य भूमिकेत, पहिला प्रोमो समोर

Zee Marathi Laxmi Niwas :  ‘झी मराठी’ वाहिनी नेहमीच विविध आशयघन मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. ‘झी मराठी’ वाहिनी ही टीआरपीच्या शर्यतीतही अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळतेय. ‘झी मराठी’ वाहिनी आणि प्रेक्षकांचे बऱ्याच वर्षांपासूनचे ऋणानुबंध असलेले पाहायला मिळतात. गेली २५ वर्ष ही वाहिनी नवनवीन मालिका घेऊन प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसली. नात्यांची परंपरा जपणारी अनेक विषय हाताळत ही वाहिनी नेहमीच प्रेक्षकांच्या जवळची राहिली. आता ‘झी मराठी’ वाहिनीवर लवकरच सुरु होणाऱ्या आयका नव्या मालिकेच्या प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. हो. ही नवी मालिका काही दिवसातच सुरु होणार असून या मालिकेचे नाव ‘लक्ष्मी निवास’ आहे.

‘झी मराठी’ नात्यांचा पुरस्कार सोहळा २०२४ नुकताच प्रदर्शित झाला. यावेळी या नव्या मालिकेची टीम ही येथे उपस्थित असलेली पाहायला मिळाली. काल या मालिकेचा पहिला प्रोमो सोशल मीडियावरुन शेअर करण्यात आला. अखेर हा प्रोमो आता प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळतंय की, या नव्या ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत अभिनेत्री हर्षदा खानविलकर आणि अभिनेते तुषार दळवी ही जोडी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

आणखी वाचा – “लक्षात ठेव आमचं अमरावतीचं घर तुझंच आहे आणि…”, सूरज चव्हाणशी आर्याच्या आईचं भावुक संभाषण, म्हणाल्या, “भाऊ आहेस तर…”

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आपलं हक्काचं घर असावं असं स्वप्न पाहणारं वयोवृद्ध जोडपं लक्ष्मी व श्रीनिवास यांच्या आयुष्यावर बेतलेली गोष्ट ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत दाखवण्यात आली आहे. मालिकेच्या प्रोमोमध्ये हे वयोवृद्ध जोडपं एका जुन्या स्कूटरवरुन प्रवास करताना दिसत आहे. कुटुंब, नोकरी, मुलींची थाटामाटात लग्न, पैशांची जुळवाजुळव या सगळ्या जबाबदाऱ्या निभावून आता लक्ष्मी व श्रीनिवास त्यांचं हक्काचं घर कसं बांधणार याचा प्रवास या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

आणखी वाचा – “तुला बघून खूप बरं वाटलं”, अंकिताच्या आईचा सूरज चव्हाणला व्हिडीओ कॉल, म्हणाला, “मी आहे ना तिचा भाऊ आणि…”

“एकमेकांच्या साथीने आणि एकमेकांच्या सोबतीनेच बनतं ‘लक्ष्मीनिवास’!” असं कॅप्शन देत झी मराठी वाहिनीने याचा पहिला प्रोमो प्रेक्षकांबरोबर शेअर केला आहे. मालिकेत आणखी कोणते कलाकार असणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. मात्र प्रोमोमधील फोटोवरुन मालिकेत दमदार कलाकारांची फौज पाहायला मिळणार असल्याचं दिसतंय.

Tags: harshada khanvilkarMARATHI NEW SERIALZee Marathi Laxmi Niwas
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Zee Marathi Awards 2024

Zee Marathi Awards 2024 : सोहळ्यात 'या' अभिनेत्रीने पटकावले अनेक पुरस्कार, लक्षवेधी चेहरा ठरला…; वाचा यादी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.