छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये कायमच टीआरपीच्या शर्यतीत उच्चांक गाठण्यासाठी चुरशीची लढत असते. बरेचसे प्रेक्षक ‘झी ५’, ‘जिओ सिनेमा’, ‘हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर मालिका किंवा कार्यक्रम पाहणं पसंत करतात. त्यामुळे दर आठवड्याला ज्याप्रमाणे टेलिव्हिजन टीआरपी येतो त्याप्रमाणे ऑनलाईन टीआरपीची स्वतंत्र यादी दिली जाते. टीआरपीच्या गणितावरच मालिका अधिक काळासाठी सुरू ठेवायची की नाही? हे ठरवलं जातं. टीआरपी कमी असेल तर मालिका बंदही झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सध्या अनेक वाहीनींवर अनेक मालिका सुरु आहेत. वेगवेगळा आशय व वेगवेगळया विषयांच्या या मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहेत. (Paaru Serial TRP)
यापैकी झी मराठीवरील ‘पारू’ ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक ठरू लागली आहे. नुकतंच मालिकेत वेगळे वळण आले असून, प्रीतम आणि प्रिया यांचे लग्न झाल्याचे पाहायला मिळाले. मालिकेची हीच कथा प्रेक्षकांच्या पसंतीस पडली असून प्रेक्षकांनी या मालिकेला ३.६ इतकी रेटिंग मिळाली आहे. ‘द मराठी एंटरटेनमेंट मीडिया या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.

आणखी वाचा – वाढलेलं पोट, वजन, हाताला दुखापत अन्…; अभिषेक बच्चनची अशी अवस्था का?, फोटो व व्हिडीओ समोर
‘द मराठी एंटरटेनमेंट मीडिया’ या सोशल मीडिया अकाऊंटने झी मराठीवरील ‘पारू’मालिकेचा TVR (Television Rating) ३.६ दिला आहे. ‘पारू’ मालिकेचा टीआरपीचा हा नवीन टप्पा असल्याचे या पोस्टमधून म्हटलं आहे. यानिमित्ताने ‘पारू’ मालिकेच्या कलाकारांनी सेटवर जंगी सेलिब्रेशन केल्याचेही पाहायला मिळाले. या मालिकेतील आदित्य म्हणजेच अभिनेता प्रसाद जवादेने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ३.६ टीआरपी लिहलेला केकचा फोटो शेअर केला आहे.
आणखी वाचा – काळवीट प्रकरणानंतर सलमान खानने बिश्नोई समाजाला दिली होती पैशांची ऑफर, लॉरेन्सच्या भावाचा मोठा दावा
‘पारू’ या मालिकेतील पारू आणि आदित्य या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची वेगळी जागा निर्माण केली आहे. मालिकेत सतत येणाऱ्या ट्विस्टमुळे आणि वेगळ्या धाटणीच्या कथानकामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. आता पारू आणि आदित्यच्या भावना सांगणारे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, आदित्य पारूला चांगली मैत्रीण समजतो. आता आदित्यदेखील पारूच्या प्रेमात पडणार का? आदित्यची आई अहिल्यादेवी त्यांचे लग्न होऊ देणार का, हे पाहणे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचे असणार आहे.