मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘चारचौघी’ नाटकानंतर माय-लेकीची जोडी ‘माया’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर, दोघींचाही कुल अंदाज भावला आणि…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 30, 2026 | 11:35 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Maya Marathi Movie

'चारचौघी' नाटकानंतर माय-लेकीची जोडी 'माया' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर, दोघींचाही कुल अंदाज भावला आणि…

Maya Marathi Movie : मराठी रंगभूमीवर माय–लेकीचं नातं अत्यंत संवेदनशीलतेनं मांडणाऱ्या गाजलेल्या ‘चारचौघी’ या नाटकातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या रोहिणी हट्टंगडी आणि मुक्ता बर्वे या दोन दिग्गज अभिनेत्री पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. यावेळी त्या रंगभूमीवर नव्हे, तर मोठ्या पडद्यावर ‘माया’ या आगामी मराठी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. ‘चारचौघी’सारख्या स्त्रीप्रधान नाटकानंतर आता ‘माया’ या चित्रपटातही या दोघी स्वतंत्र विचारांच्या, स्वाभिमानी आणि आत्मभान असलेल्या स्त्री व्यक्तिरेखा साकारणार आहेत. अनुभव आणि अभिनयातील परिपक्वतेचा संगम असलेली ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावणारी ठरत आहे.

रोहिणी हट्टंगडी यांचा अभिनय म्हणजे सूक्ष्मतेतून मोठे भाव उलगडणारी प्रक्रिया, तर मुक्ता बर्वे ही आधुनिक स्त्रीचं सशक्त प्रतिनिधित्व करणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. त्यामुळे ‘माया’ मध्ये त्यांचा केवळ अभिनय नाही तर, स्त्रीमनाच्या विविध छटांची प्रगल्भ मांडणी पाहायला मिळणार आहे. रोहिणी हट्टंगडी म्हणतात, ”मुक्तासोबत पुन्हा काम करणं हा एक अत्यंत समाधान देणारा अनुभव आहे. ती एक संवेदनशील, विचारशील आणि स्वतःच्या अभिनयाबाबत प्रचंड प्रामाणिक अभिनेत्री आहे. तिच्यासोबत काम करताना समोरची व्यक्तिरेखा अधिक सखोल होते. अभिनय म्हणजे केवळ संवाद बोलणं नसून, तो जगण्याचा अनुभव असतो आणि मुक्ताकडे तो अनुभव मनापासून स्वीकारण्याची क्षमता आहे. तिच्यासोबतचा प्रत्येक सीन मला अभिनेत्री म्हणून अधिक समृद्ध करुन जातो.”

आणखी वाचा – “तुला शिव्या देण्याची सवय आहे”, अनुश्री-प्राजक्तामध्ये पेटला वाद; प्रोमोमधील कॅट फाईट पाहून चाहते उत्सुक

View this post on Instagram

A post shared by Maya Marathi Film (@mayamarathifilm)

मुक्ता बर्वे आपल्या अनुभवाबद्दल बोलते, ”रोहिणी ताईंसोबत पुन्हा काम करणं, ही माझ्यासाठी शिकण्याचीच एक प्रक्रिया आहे. त्यांच्या अनुभवातून येणारी शांतता, प्रसंग समजून घेण्याची दृष्टी आणि अभिनयातील प्रगल्भता सतत प्रेरणा देते. सेटवर त्यांच्यासोबत असताना अभिनय सहज घडतो. त्यांनी आयुष्य आणि अभिनय दोन्ही खूप खोलवर अनुभवलं आहे आणि ते त्यांच्या प्रत्येक भूमिकेत दिसून येतं. अशा कलाकारासोबत काम करणं हे खरं तर भाग्य आहे.”

आणखी वाचा – सुप्रसिद्ध कॉमेडियनचा कॉमेडीपासून मोठा ब्रेक, ‘या’ आजाराशी देतोय झुंज, स्वतःच केला खुलासा…

शालिनी सिनेमाज आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन निर्मित ‘माया’ या चित्रपटाचे निर्माते डॉ. सुनील दातार, अलका मधुकर दातार आणि नितीन प्रकाश वैद्य आहेत. आदित्य इंगळे दिग्दर्शित या चित्रपटात मुक्ता बर्वे, रोहिणी हट्टंगडी यांच्यासह गिरीश ओक, सिद्धार्थ चांदेकर आणि विजय केंकरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणारा ‘माया’ हा चित्रपट त्याच्या पोस्टरमुळे आधीच चर्चेत असून, नात्यांच्या गुंत्यातून उमटणारी, स्त्रीमनाच्या स्वातंत्र्याची आणि आत्मशोधाची ही कथा प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भिडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Tags: marathi actressMaya Marathi Moviemukta barverohini hattangadi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Govinda Latest News

"मर्सिडीज, बीएमडब्ल्यूमधून फिरायचा…", गोविंदाला टॅक्सीमध्ये प्रवास करताना पाहून नेटकरी म्हणाले, "त्याचा वाईट काळ…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.