प्रिन्स नरुला व युविका चौधरी सध्या नव्याने आयुष्य जगत आहेत. आई-वडील झाल्यानंतर नव्या जबाबदाऱ्या त्या प्रेमाने पार पाडत आहेत. अशातच मध्यंतरी प्रिन्स व युविका यांच्या नात्यामध्ये वादाची ठिणगी पडली असल्याचं बोललं जात होतं. लवकरच दोघंही वेगळे होणार असल्याच्याही चर्चा रंगल्या. इतकंच काय तर युविकाच्या डिलिव्हरीदरम्यान प्रिन्स हजरही नव्हता असंही काही वृत्तांमधून समोर आलं. पण हे सगळं खोटं असल्याचं आता समोर आलं आहे. युविकाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रेग्नंसी व प्रिन्सबरोबरच्या नात्याबाबत भाष्य केलं. यावरुनच दोघांमध्ये सगळं सुरळीत सुरु असल्याचंही समोर आलं. (yuvika chaudhary prince narula relationship)
पारस छाब्राच्या पॉडकास्टमध्ये युविकाने हजेरी लावली होती. यावेळी तिने प्रेग्नंसीदरम्यान नक्की काय झालं?, जेव्हा ती बाळाला जन्म देणार होती तेव्हा प्रिन्सने कशी साथ दिली? याबाबत सांगितलं. युविका म्हणाली, “डिलिव्हरीसाठी जेव्हा मी गेले तेव्हा प्रिन्स माझ्याबरोबरच होता. मग मला त्याची त्यावेळी का आठवण येईल?. अफवांवर विश्वास ठेऊ नका. तो तिथेच उभा होता. प्रत्येक क्षण, मुलाचा जन्म कॅमेऱ्यात कैद करत होता”.
आणखी वाचा – “लगेच चिडली आणि…”, अमृता खानविलकरने नवऱ्याला केलेलं अनफॉलो, हिमांशू अखेर म्हणाला, “रागारागात तिने मला…”
“मी मुलाला जन्म देत असताना प्रिन्स डिलिव्हरी रुमममध्ये माझ्याबरोबर असावा हे मला कायमच वाटत आलं. मुलाला जन्म देताना एका स्त्रीला काय काय सहन करावं लागतं हे त्यालाही कळलं पाहिजे. त्यानेही सगळं डोळ्यांनी बघितलं पाहिजे. मुल गर्भातून बाहेर कसं येते? हे त्याने पाहावं ही माझी इच्छा होती. तसेच नाळही त्यानेच कापावी असं मला वाटत होतं. त्याने माझी गर्भनाळ कापली. इतकंच काय तर तो व्हिडीओ बनवतानाही थरथर कापत होता. नाळ कापणं माझ्याकडून होणार नाही असं प्रिन्स म्हणत होता. पण तुला हे करावंच लागेल हे मी त्याला सतत सांगत होते”.
आणखी वाचा – Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…
पुढे ती म्हणाली, “त्याने हिंमत ठेवली. माझं सी-सेक्शन झालं. त्याने माझं संपूर्ण सी-सेक्शन पाहिलं. एकीकडे त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता. पण आनंदामध्येही तो घाबरला होता. एक मुलगा म्हणून जीवन जगत असताना अचानक तोही वडील झाला. त्यामुळे त्याच्यामध्येही बदल घडत होता. बदल होणं ही खूप सुंदर गोष्ट आहे. कारण यावेळी तुमच्या शरीरातही बदल होतात. तुम्ही क्षणात हसता, रडता, थरथर कापता. मी डिलिव्हरी सुरु असताना ऑपरेशन थिएटरमध्ये भक्तीगीत गात होते. ‘कौन कहते है भगवान आते नहीं’ गाणं मी म्हणत होते. मी हसत होते. मला कळत होतं की, माझं ऑपरेशन होत आहे. आता पोटाचं पहिलं आवरण कापण्यात आलं आहे हे मला कळालं होतं”. युविकाने तिचे सुंदर क्षण सगळ्यांसमोर सांगितले. तसेच दोघांच्या सुंदर नात्याचंही वर्णन केलं.