शनिवार, सप्टेंबर 12, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नितंबांना स्पर्श केला, हात फिरवला अन्…; सर्वोच्च न्यायालयात सुप्रसिद्ध अभिनेत्रीसह धक्कादायक प्रकार, जवळ येण्याच्या प्रयत्नात…

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 17, 2025 | 4:54 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Nimrit Kaur Ahluwalia Was Sexually Molested

नितंबांना स्पर्श केला, हात फिरवला अन्...; सर्वोच्च न्यायालयात सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर धक्कादायक प्रकार

महिला खरंच सुरक्षित आहेत का? हा प्रश्न एखादी अतिप्रसंग दर्शवणारी घटना घडली की समोर येतो. पण वर्षानुवर्षे या प्रश्नाचं उत्तर अधिक गुंतागुंतीचं झालं आहे. महिलांच्या सुरक्षितता हा प्रश्न अजूनही जैसे थे आहेच. इंडस्ट्रीत काम करत असणाऱ्या स्त्रियांनाही शारिरीक, लैंगिक शोषणाबाबत अनेक वाईट अनुभव येतात. आता तर एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री निमृत कौर अहलुवालिया शारिरीक शोषण झालं असल्याची घटना समोर आली. पण हे सगळं इंडस्ट्रीत काम करत असताना नव्हे तर चक्क सर्वोच्च न्यायालयामध्ये घडलं. याचविषयी तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत उघडपणे भाष्य केलं. नक्की काय घडलं होतं? हे सविस्तर जाणून घेऊया. (Nimrit Kaur Ahluwalia Was Sexually Molested)

प्रतिष्ठीत वकिलाकडून घाणेरडं कृत्य

निमृतने वकिलीचं शिक्षण घेतलं आहे. एका हाय प्रोफाइल केससाठी अभ्यास म्हणून ती काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयामध्ये गेली होती. यावेळी नक्की काय घडलं? हे तिने सांगितलं. निमृत म्हणाली, “मी कॉलेजच्या तिसऱ्या वर्षात होते. मी वकिली शिकत होते. सर्वोच्च न्यायालयामध्ये एका हाय प्रोफाइल केससाठी मी गेले होते. कोर्टात खूप गर्दी होती. कोर्टरुममध्ये आम्ही होतं. समोर न्यायाधीश बसले होते. खूप लोक होते. समोर केस संदर्भात सुनावणी सुरु होती. तिथे उपस्थित लोक केसकडे लक्ष देऊन सगळं ऐकत होते. आतमध्ये इतकी गर्दी होती की, इकडे-तिकडे हलण्यासाठीही जागा नव्हती. तिथेच माझ्याबरोबर शारिरीक शोषण झालं. एका प्रतिष्ठीत वकिलाने हे सगळं केलं होतं. इतकंच काय तर माझ्या आधी एका महिला वकीलाबरोबरही त्याने तेच केलं. आणि हे एकाच दिवशी त्याने केलं होतं”.

आणखी वाचा – तीन महिन्यांची असताना आई गेली, वडिलांचं दुसरं लग्न, छळ अन्…; ऋता दुर्गुळेच्या सासूबाईंचा वाईट काळ

View this post on Instagram

A post shared by Nimrrit Kaur Ahluwalia (@nimritahluwalia)

नितंबनावर हात फिरवला अन्…

पुढे ती म्हणाली, “एका ओळखीने मी सर्वोच्य न्यायालयामध्ये तिथे कशी परिस्थिती असते?, कसं काम चालतं? हे शिकण्यासाठी गेले होते. एका बाजूला मीडियासाठी जागा होती. एका बाजूला मी उभी होती. त्या वकिलाच्या एका हातात कागदपत्र होते. मला असं जाणवलं की, माझ्या नितंबनावर कोणाचा तरी हात आहे. मला असं वाटलं की, मीच अधिक विचार करत आहे. मी मागे वळून पाहिलं तेव्हा तो वकील लगेचच गडबडून वेगळ्याच दिशेला बघत होता. मी मग उभं राहण्याची जागाच बदलण्याचं ठरवलं. मी दुसऱ्या जागी जाऊन उभी राहिले. मी हळूहळू चालत दुसऱ्या जागेवर गेले. मग मला जाणवलं की, कोणीतरी माझ्या हाताला स्पर्श करत आहे. पुन्हा मी पाहिलं तर तिच व्यक्ती होती”.

आणखी वाचा – “लग्नानंतर डेटिंग अ‍ॅप वापरायचो, बायकोला माहितही नव्हतं अन्….”, अभिजीत सावंतचा खुलासा, म्हणाला, “गप्पा मारल्यानंतर…”

जवळ येण्याचा प्रयत्न आणि…

“त्या वकिलाने माझ्या नितंबनाला पुन्हा हात लावला. माझ्या पुढे थोड्या अंतरावर उभ्या असलेल्या महिला वकिलाने मला विचारलं तू ठिक आहे का?. कारण मी रडायला लागले. तिने थेट विचारलं की, तुझ्या पाठी जो व्यक्ती उभा आहे तो तुला त्रास देतोय का?. ती महिला मला म्हणाली की, हा थोड्यावेळापूर्वी माझ्या शर्टमध्ये हात टाकण्याचा प्रयत्न करत होता. त्या महिला वकिलाने त्याला धरलं आणि तोंडावर मारलं”. हा संपूर्ण प्रकार सांगताना निमृत रडायला लागली. सर्वोच्च न्यायालयामध्ये अशी घटना घडलं खरंच लज्जास्पद होतं.

Tags: bollywood newsentertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aali Mothi Shahani Ganesh Vandana
Entertainment

बाप्पाच्या भक्तीत रंगणार ‘आली मोठी शहाणी’ मधील ‘गणेश वंदना’,

सप्टेंबर 12, 2026 | 10:16 am
Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Next Post
Actress mugdha shah after marriage struggle

२०शीत लग्न, गरोदरपणात सासूने घराबाहेर काढलं अन्...; ऋता दुर्गुळेच्या सासूबाईंच्या नशिबी वनवास, सासरीही छळ आणि...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.