Ajit Pawar Death: राज्यातून सध्या एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रवासादरम्यान मोठा विमान अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेने, म्हणजेच बारामतीकडे येत असताना हा अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार हे बारामती येथे सभेसाठी आले होते. मात्र, लँडिंग करताना विमानाला अपघात झाल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
आणखी वाचा: मोठी बातमी! महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू
आत्तापर्यंत सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा रेकॉर्ड हा अजित पवार यांच्या नावे आहे. महाराष्ट्र अजित पवारांच्या राजकारणाला आता पोरका झाला आहे. दरम्यान, अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांचा व्हिडीओ समोर आला आहे. युगेंद्र पवार फोनवर बोलत असताना त्यांना रडू आवरत नव्हतं. युगेंद्र पवार आणि अजित पवार यांनी एकमेकांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचे कौटुंबिक संबंध हे अत्यंत जिव्हाळ्याचे होते. अजित पवारांच्या जाण्यानंतर आता युगेंद्र पवार यांना अश्रू अनावर झाले आहेत. या बातमीनंतर इतरही नेत्यांना अश्रू अनावर झाले. (Ajit Pawar Death)
दरम्यान बारामतीमध्ये विमान लाँडिंग होत असतानाच विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने विमान अपघातग्रस्त झाले. विमानामध्ये अजित पवार यांच्यासह सहा जण होते आणि या सहा जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. खराब हवामान आणि तांत्रिक बिघाडामुळे विमान लँडिंगदरम्यान नियंत्रणाबाहेर जाऊन कोसळले. या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील इतर काही प्रवाशांचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे. काही जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य युद्धपातळीवर राबवण्यात आले. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी नागरी विमान वाहतूक विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. (Ajit Pawar Death)



