शनिवार, जून 13, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video: हनी सिंगच्या कॉन्सर्टमध्ये गोंधळ, महिला चाहती थेट बंद गेटवर चढली आणि…; सुरक्षा रक्षकांना शिवीगाळ

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 31, 2026 | 1:40 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
yo yo honey singh mumbai concert

Video: हनी सिंगच्या कॉन्सर्टमध्ये गोंधळ, महिला चाहती थेट बंद गेटवर चढली आणि…; सुरक्षा रक्षकांना शिवीगाळ

yo yo honey singh mumbai concert : गायक रॅपर यो यो हनी सिंगचा एक कॉन्सर्ट मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या घटनेचा एक व्हिडीओ खूप चर्चेत आहे ज्यामध्ये एक महिला फॅन बंद गेटवर चढून ओलांडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना असे करण्यापासून रोखण्यासाठी सुरक्षारक्षक तेथे पोहोचले असता महिला त्यांना शिवीगाळ करताना दिसली. हनी सिंग त्याच्या ‘माय स्टोरी – इंडिया चॅप्टर’ टूर दरम्यान शनिवारी २८ मार्च रोजी मुंबईत परफॉर्म करत होता. वांद्रे येथील एमएमआरडीए मैदानावर गायक परफॉर्म करत होता. ‘डोप शॉप’, ‘ब्लू आईज’, ‘ब्राऊन रंग’, ‘मिलियनियर’, ‘देसी कलक’ आणि ‘लुंगी डान्स’ यांसारखी हिट गाणी गाऊन त्याने पुन्हा चाहत्यांची मने जिंकली. यावेळी कॅमेऱ्यात असे काही कैद झाले, ज्यासाठी कोणीही तयार नव्हते. बंद गेटवर एक महिला चढण्याचा प्रयत्न करताना रक्षकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं.

रक्षकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना कॅम्पसच्या पलीकडे ढकलण्यास सुरुवात केली. यादरम्यान ती आत येण्यात यशस्वी होईल असे वाटत नव्हते, पण व्हिडीओ पाहता ती गार्डला चांगले-वाईट बोलत असल्याचं दिसलं.या घटनेचा व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वास्तविक, त्या वेळी जे काही चालले होते ते अनेकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.

आणखी वाचा – “माझ्यावर पाकमध्ये हल्ला झाला, पण पाकिस्तानने मला वाचवलं”, कराची बॉम्बस्फोटादरम्यान थोडक्यात बचावलेला सुप्रसिद्ध गायक, म्हणाला…

Scence from Yesterday Yo Yo Honey Singh Concert 💀

– This girl arrive when Gate was close but she still try to argue with guards to open the gate 🤦 pic.twitter.com/h1WF61iQiF— Sumit (@beingsumit01) March 29, 2026

आता हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक कार्यक्रमाच्या व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित करत आहेत. मात्र, मुंबईत आयोजित केलेल्या या कॉन्सर्टमधील निकृष्ट व्यवस्थेबाबत लोक आधीच तक्रारी करत आहेत आणि अशा परिस्थितीत हा व्हिडीओ पाहून लोक आणखीच गोंधळ घालत आहेत.

आणखी वाचा – अनाथाश्रमात बालपण, धर्म बदलला कारण…; प्रकाश राज यांना मातृशोक, आईचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन, अंत्यसंस्कार…

ज्यांच्याकडे प्लॅटिनम विभागाचे तिकीट नव्हते, असे लोक रिस्टबँडशिवाय तेथे प्रवेश केल्याची तक्रार या कार्यक्रमात करण्यात आली आहे, त्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. हनी सिंग ४ एप्रिलला पुण्यात, ११ एप्रिलला कोटा, २५ एप्रिलला इंदूरमध्ये, २ मे रोजी लखनऊमध्ये आणि ९ मे रोजी कोलकत्त्यात परफॉर्म करणार आहे. यानंतर, शेवटी १६ मे रोजी बेंगळुरू येथे मैफिलीचा शेवट होईल.

Tags: fan behaviouryo yo honey singhyo yo honey singh concert
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Prajakta Mali Business

ज्वेलरी ब्रँडबाबत प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, "अजूनही बरीच कारणं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.