ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेच्या माध्यमातून अक्षरा म्हणजेच हिना खान ही खूप चर्चेत आली. हिनाने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच अनेक वेबसिरिजमध्येही तिने महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. ‘कसोटी जिंदगी की २’ या मालिकेमध्येही ‘कोमोलिका’ ही भूमिका साकारली होती. पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेमध्ये दिसल्याने प्रेक्षकांनी खूप पसंतीही दर्शवली होती. सोशल मीडियावरदेखील तिला खूप लोकप्रियता मिळाली आहे. (hina khan on periods)
सध्या हिना तिचा पहिला पंजाबी चित्रपट ‘शिंदा शिंदा नो पापा’मुळे खूप चर्चेत आली आहे. तिने या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच पंजाबी मनोरंजन क्षेत्रांमध्ये पाऊल ठेवले आहे. सोशल मीडियावरील तिच्या अनेक फोटो व व्हिडीओची चर्चा होताना दिसते. हिनाने नुकतेच मासिक पाळीबद्दल भाष्य केले आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर मासिक पाळीसंदर्भातील एक पोस्ट केली असून ती सध्या खूप चर्चेत आली आहे. तिने मासिक पाळीबद्दल पोस्ट करत लिहिले की, “जर पाळीच्या दोन दिवस आधी दोन दिवस चित्रीकरण करण्याचा पर्याय हवा होता. असे असते तर खूप बरे झाले असते”.

पुढे तिने लिहिले की, “पाळीच्या काळात आमच्यामध्ये काम करण्याची ताकद नसते. ४० अंश सेल्सिअस तापमानात चित्रकरण करावे लागते. पोट दुखणं, मूड बदलणे, डिहायड्रेशन, गरमी, अस्वस्थता, रक्तदाब कमी होणं, अशा परिस्थितिमध्ये चित्रकरण करणं खूप कठीण असतं”.
हिनाआधी बऱ्याच अभिनेत्रीनी मासिक पाळीदरम्यान काम करण्याबद्दल भाष्य केले होते. करीना कपूरने देखील नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितले की, “अनेक महिलांना या दिवसांमध्ये खूप त्रास होतो. अशावेळी त्यांनी किती आराम करावा हे देखील महत्त्वाचं असतं”.
दरम्यान हिनाच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, ती आता पंजाबी अभिनेता व गायक गिप्पी गरेवालबरोबर ‘शिंदा शिंदा नो पापा’ या चित्रपटामध्ये काम करताना दिसत आहे. याआधी ती ‘बिग बॉस’ मध्येही दिसून आली होती. या कार्यक्रमामुळे तिला अधिक लोकप्रियता मिळाली होती.