गुरूवार, जून 5, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“बालिश मीम्स, टीका, दाखवलेलं स्वप्न अन्…”, ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करताच जितेंद्र जोशीची लक्षवेधी पोस्ट, म्हणाला, ” तुम्ही आमच्यापेक्षा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 20, 2023 | 10:23 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Jitendra Joshi On Cricket World Cup 2023

"बालिश मीम्स, टीका, दाखवलेलं स्वप्न अन्…", ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करताच जितेंद्र जोशीची लक्षवेधी पोस्ट, म्हणाला, " तुम्ही आमच्यापेक्षा…"

विश्वचषक २०२३ या यंदाच्या अंतिम सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले. यामुळे तमाम भारतीयांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलं आहे. अनेक मराठी कलाकारांनी यासंदर्भात पोस्ट शेअर करत व्यक्त केलेल्या भावना लक्ष वेधून घेत आहेत. अशातच अभिनेता जितेंद्र जोशी याने शेअर केलेली भावुक पोस्ट लक्षवेधी ठरत आहे. (Jitendra Joshi On Cricket World Cup 2023)

जितेंद्र जोशी याने पोस्ट शेअर करत भारताच्या पराभवावरून नाराजी व्यक्त केली असली तरी सर्व खेळाडूंच्या या सिरीजमधील यशस्वी खेळाचं कौतुकही केलं आहे. इतकंच नव्हे तर विजेतेपद पटकवलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला शुभेच्छाही दिल्या आहेत. पोस्ट शेअर करत जितेंद्र जोशी म्हणाला की, “आता पराभवानंतर काहीजण आपल्या संघाबद्दल वाईट प्रतिक्रिया देतील, त्यांच्याबद्दल उलटसुलट बोललं जाईल आणि टीकाही करण्यात येतील. काही नेटकऱ्यांनी तर आधीच बालिश मीम्स बनवले आहेत. पण, या संपूर्ण सीरिजमध्ये आपल्या संघाने उत्कृष्ट कामगिरी केली हे विसरून चालणार नाही.

आणखी वाचा – विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील पराभवामुळे पुर्णपणे खचला भारतीय क्रिकेटर विराट कोहली, नवऱ्याला मिठी मारत हिंमत देताना दिसली अनुष्का शर्मा

यापुढे भारतीय संघाचं कौतुक करत अभिनेता पुढे म्हणाला, “आपल्या टीमचा मला प्रचंड अभिमान आहे कारण, एकही सामना न गमावता त्यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. आपल्याला स्वप्न दाखवली. यंदा आपण जिंकू असा विश्वास आपल्यात निर्माण केला. आपण सगळे एक प्रेक्षक व कुटुंब म्हणून एकत्र खेळलो. शेवटी हा एक खेळ आहे! कुणाला जिंकण्यासाठी कुणाला तरी हार मानावी लागते. हा दिवस आपला नसला तरी आपली टीम खूप चांगला खेळ खेळली आहे. आता मी खरंच दु:खी आहे पण त्या खेळाडूंपुढे आपलं दु:ख काहीच नाही. त्यांनी सर्वस्व पणाला लावलं होतं. आपल्या सर्वांच्या वतीने ते मैदानात खेळले”.

View this post on Instagram

A post shared by jitendra joshi (@jitendrajoshi27)

आणखी वाचा – “जेव्हा तू मिस युनिव्हर्सचा खिताब…”, सुश्मिता सेनसाठी हेमांगी कवीची खास पोस्ट, म्हणाली, “तुझ्या शेजारी बसणं…”

“आपण या विश्वचषकात सर्वोत्कृष्ट ठरलो नाही याचा अर्थ आपण हरलो असा होत नाही. माझ्या टीमला माझा कायम पाठिंबा आहे. मी कायम त्यांच्याबरोबर आहे. ऑस्ट्रेलिया संघाचे अभिनंदन. तुम्ही आमच्यापेक्षा चांगला खेळ खेळलात!” असं म्हणत जितेंद्र जोशीने विश्वचषकात खेळून विजेतेपद पटकवलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचे अभिनंदन केले आहे. तसेच भारतीय संघाचं कौतुक करत त्यांना पाठिंबा दर्शविला आहे.

Tags: emotional postentertainmentjitendra joshiJitendra Joshi On Cricket World Cupmarathi actoemarathi actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Anushka Sharma On RCB Victory Parade Turns Stampede
Entertainment

बंगळुरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू अन्…; विराट कोहली पाठोपाठ अनुष्का शर्माची प्रतिक्रिया, म्हणाली…

जून 5, 2025 | 12:01 pm
Vivek oberoi on bengaluru stampede
Entertainment

बंगळुरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यूचं तांडव, विवेक ओबरॉयची पोस्ट, म्हणाला, “जवळच्या माणसांना गमावणं…”

जून 5, 2025 | 11:28 am
 Hina Khan Trolled After Marriage
Entertainment

“तुझ्या नवऱ्याने इस्लाम धर्म स्वीकारला का?”, आंतरजातीय लग्न करताच हिना खान ट्रोल, नेटकरी म्हणाले, “तुझ्या आईने…”

जून 5, 2025 | 11:20 am
Hina Khan Wedding
Entertainment

११ वर्ष डेट, वडिलांचा मृत्यू आणि कॅन्सरशी लढा; प्रत्येक अडथळ्यांमध्ये हिना खानला मिळाली पतीची साथ, अखेर अडकले लग्नबंधनात

जून 5, 2025 | 11:00 am
Next Post
aai kuthe kay karte fame actor milind gawali shared lohgad fort video on instagram

लोहगडावर पोहोचले 'आई कुठे काय करते?' फेम मिलींद गवळी, फोटो पोस्ट करत म्हणाले, "माझा कुत्राही गड चढला अन्…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.