रविवार, ऑगस्ट 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मासिक पाळीच्या गोळ्या घेणं योग्य की अयोग्य?, डॉक्टरांचा मोठा खुलासा, म्हणाल्या, “साध्या कारणांसाठी…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 8, 2025 | 4:22 pm
in Women
Reading Time: 1 min read
google-news
women periods problem

मासिक पाळीच्या गोळ्या घेणं योग्य की अयोग्य?, डॉक्टरांचा मोठा खुलासा, म्हणाल्या, "साध्या कारणांसाठी…"

women periods problem : सध्या एकामागोमाग एक सण आहेत. आणि या सणांमध्ये महिलांना नेहमीच काळजीत पाडणारा विषय म्हणजे मासिक पाळी. अनेक स्त्रियांना मासिक पाळी ऐन सणात तर येणार नाही ना अशी चिंता सतावत असते. अर्थातच सगळेच सण मिळणं शक्य नाही अशावेळी अनेक स्त्रिया गोळ्या घेण्याला प्राधान्य देतात. सध्या महिलांचा हा गोळ्या घेण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बरेचदा अनियनमित पाळीमुळे अनेक स्त्रिया डॉक्टरांचा सल्ला न घेता गोळ्या घेतात याचा त्या महिलेच्या शरीरावर कितपत परिणाम होतो हा मोठा प्रश्न साऱ्यांना पडतो. तर या प्रश्नाचे अचूक असे उत्तर ‘मज्जा पिंक’च्या ‘majja welness’ या कार्यक्रमात मिळाले आहे. या कार्यक्रमात अभिनेत्री खुशबू तावडेने डॉ. श्रद्धा उपासनी यांच्यासह संवाद साधला.

डॉ. श्रद्धा उपासनी या MBBS, M.D. (Bom) D.G.O., D.F.P., F.LC.O.G.असून त्या Upasani Super Speciality Hospital Pvt Ltd.च्या चेअरपर्सन आणि फाउंडर आहेत. ५०,००० हजाराहून अधिक यशस्वी बाळंतपण पार पाडणाऱ्या अनुभवी डॉक्टरांपैकी त्या एक आहेत. ‘majja welness’ या शोमध्ये त्यांनी स्त्रियांच्या अनेक समस्यांबाबत खुलेपणाने भाष्य केलं आणि खुशबूच्या अनेक प्रश्नाचं निरर्थन केलं. यावेळी खुशबूने त्यांना, “पण Coming back to अनियमित पाळी आपण जे म्हणत होतो त्याकाळात सुद्धा बऱ्याच स्त्रिया सुद्धा गोळ्या घेतात म्हणजे अगदी teenage पासून सुरु होऊन जातं जेव्हा पाळी येते. एखादा सण असेल त्यामध्ये आपण गोळ्या घेतो मोठ्यांनी सांगितलेलं असतं गणपती आहेत. आता पाळी नको यायला तर ही गोळी घे, सण चुकायला नको आपला उपवास आहे. मामाच्या मुलाचं किंवा कोणाचं लग्न आहे तर सर्रास गोळी घेणं हे एक बऱ्याच मैत्रणींकडून त्यांच्या आईंकडून मी बघितलेलं आहे ऐकलेलं आहे हे कितपत योग्य आहे आणि समजा त्याकाळात त्यांनी घेतल्या होत्या तर त्याचा आज काय परिणाम होत असेल?”.

आणखी वाचा – कोणाला भेटू द्यायचे नाही, खूप निर्बंध होते आणि…; वैयक्तिक आयुष्यातील अडचणीतून अशी बाहेर पडली स्नेहा वाघ, म्हणाली…

यावर डॉ. श्रद्धा उपासनी यांनी म्हटलं, “एखाद्या वेळेला गोळी घेणं ठीक आहे आणि ते पण अगदी स्ट्रॉंग कारण असेल किंवा कोणाचं लग्न असेल तर ठीक आहे. पण दरवर्षी प्रत्येक गणपतीला घेणं किंवा कुठल्या तरी साध्या कारणांसाठी पाळी लांबवणं त्याच्यामुळे हॉर्मोन चा imbalance होतो आणि आणि त्या गोळ्या सुद्धा कुठल्या प्रकारच्या घेत आहात त्याच्यावर सुद्धा अवलंबून असतं. Estrogen progesterone combination च्या गोळ्या असतात आणि एक नुसत्या progesterone च्या पण असतात त्यामुळे गोळ्या घेताना फक्त progesterone असलेल्या घेतल्या तर ते बरं असतं. दोन्ही hormone असलेल्या गोळ्यांनी आणखीन नंतर Hormonal imbalance जास्त होतो आणि वरचे वर घेणं तर बरोबर नाही. त्यामुळे Ovulation, periods irregular होणं हे फार कॉमन होतं”.

यावर खुशबु म्हणाली, “पण त्याचबरोबर पीरिड्समध्ये जे पोटात दुखतं त्यासाठी सुद्धा काही गोळ्या मिळतात किंवा ते pain थांबवण्यासाठी”. यावर डॉक्टर म्हणाल्या, “पण त्याच्यासाठी तुम्ही सध्या गोळ्या घ्या एकदम strong गोळ्या घेऊ नका”. यावर खुशबूने त्यांना विचारलं, “या गोळ्यांनी दुखणं थांबतं पण त्यावर दुसरा काही घरगुती उपाय आहे का किंवा असतो का?”.

आणखी वाचा – आईला कॅन्सरचे निदान, मालिकेचं शूट आणि…; ‘पारू’ फेम आदित्यने चोखपणे सांभाळल्या जबाबदाऱ्या, पुरस्कार मिळताच भावुक

यावर डॉ. उपासनी म्हणाल्या, “घरगुती उपाय आता मला नाही वाटत पण मी म्हटल्याप्रमाणे अगदी खूपच जर दुखत असेल तर मग आपण ज्या family planning च्या गोळ्या घेतो त्यात Estrogen progesterone दोन्ही असतं त्या तीन महिन्याच्या किंवा ६ महिन्याच्या तो कोर्स केल्यानंतर मग usually पोटात दुखतं नाही. periods च्या वेळेला मैत्रिणीने घेतलं किंवा घरात आणखी कोणी घेतलं तर मग ही चुकीची गोष्ट आहे”.

Tags: periods problemwomen healthwomen periods
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 Tejaswini Lonari & Samadhan Sarvankar Baby Boy
Entertainment

सुप्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, केलं चिमुकल्या बाळाचे स्वागत, कौतुकाचा वर्षाव

ऑगस्ट 22, 2026 | 4:21 pm
Lagnantar Hoyilch Prem Promo
Entertainment

‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत मोठा ट्विस्ट! कॉलेजमध्येच नंदिनीने केली काव्याची डिलिव्हरी, प्रोमो पाहून प्रेक्षक थक्क

ऑगस्ट 20, 2026 | 5:54 pm
Monsoon Kitchen Tips
Lifestyle

पावसाळ्यात मीठ वारंवार ओलसर होतंय? ‘या’ किचन टिप्स वापरून व्हा समस्येपासून मुक्त

ऑगस्ट 19, 2026 | 11:19 am
Munna Bhai Fame actor's Car Hits Two People
Entertainment

‘लगे राहो मुन्ना भाई’ फेम अभिनेत्याच्या कारची स्कूटरला धडक; दोन जण गंभीर जखमी

ऑगस्ट 18, 2026 | 2:05 pm
Next Post
harshada khanvilkar emotional

वडील गेले, आयुष्यातील मोठं दुःख पचवलं; भावनिक आठवण सांगत हर्षदा खानविलकर भावुक, मंचावर बहिणीला पाहताच दोघींच्याही डोळ्यात पाणी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.