शनिवार, सप्टेंबर 5, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वडील गेले, आयुष्यातील मोठं दुःख पचवलं; भावनिक आठवण सांगत हर्षदा खानविलकर भावुक, मंचावर बहिणीला पाहताच दोघींच्याही डोळ्यात पाणी

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 9, 2025 | 11:20 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
harshada khanvilkar emotional

वडील गेले, आयुष्यातील मोठं दुःख पचवलं; भावनिक आठवण सांगत हर्षदा खानविलकर भावुक, मंचावर बहिणीला पाहताच दोघींच्याही डोळ्यात पाणी

harshada khanvilkar emotional : ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळा २०२५ साठी सगळेच कलाकार आणि प्रेक्षकही उत्सुक आहेत. हा सोहळा पाहणं म्हणजे एखादा सण साजरा करण्यासारखं आहे. सगळेच कलाकार या सोहळ्यासाठी एकत्र येत त्यांची कला अगदी पारंपरिक अंदाजात साजरी करतात. यंदाचा पुरस्कार सोहळा हा थोडा खास आहे. कारण या सोहळ्याला झी मराठीच्या साऱ्या कलाकारांना खास सरप्राईज मिळालं आहे. यावेळी कलाकारांचे कुटुंबीय मंचावर त्यांच्या भेटीस आले. आणि त्यांना पाहून साऱ्या कलाकारांचे डोळे पाणावले. यावेळी अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांना भेटायलाही त्यांच्या कुटुंबातील आणि त्यांच्या जवळची खास व्यक्ती आली. तिला पाहताच हर्षदा भावुक झालेल्या दिसल्या.

सध्या हर्षदा यांचा हा भावुक करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हर्षदा खानविलकर सध्या ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. त्यांनी या मालिकेत साकारलेल्या लक्ष्मीच्या भूमिकेने अल्पावधीतच साऱ्यांचं मन जिंकलं आहे. यंदाच्या या पुरस्कार सोहळ्यात त्यांनाही पुरस्कार मिळाला आहे पण तो पुरस्कार नेमका कोणता आहे याचा उलगडा ११ वा १२ तारीखला होईल. हर्षदा यांना भेटायला त्यांची धाकटी बहीण अर्चना आली होती. यावेळी बहिणीला पाहताच त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. यावेळी त्यांनी एक भावनिक आठवणही शेअर केली.

आणखी वाचा – कोणाला भेटू द्यायचे नाही, खूप निर्बंध होते आणि…; वैयक्तिक आयुष्यातील अडचणीतून अशी बाहेर पडली स्नेहा वाघ, म्हणाली…

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये हर्षदा खानविलकर सांगतात, “अर्चना माझी धाकटी बहीण आहे. आम्ही लहान असताना आमच्यात फार बरे संबंध नव्हते. पण, हळुहळू परिस्थिती फार बदलली. आम्ही दोघींनी मिळून आमच्या आयुष्यातलं सर्वात मोठं दुःख पचवलं. माझे वडील गेले… त्यानंतर अर्चना आणि मी एकमेकांवर खूप जास्त अवलंबून राहायला लागलो”.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध पंजाबी गायकाचे निधन, अपघाती मृत्यूने चाहते भावुक, १२ दिवसांपासून होता व्हेंटिलेटरवर आणि…

पुढे त्या म्हणाल्या, “आता अर्चना माझ्यासाठी बहीण आहे, लेक आहे. कधीकधी ती माझी आई होते आणि आता तर ती माझी सर्वात जवळची मैत्रीण झाली आहे. या सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिने मला आयुष्यात सगळ्यात मौल्यवान गिफ्ट दिलं. ते गिफ्ट म्हणजे तिचा मुलगा. त्याला मी माझा ‘बुढापे का सहारा’ म्हणते. त्याच्यासारखं मौल्यवान गिफ्ट मला कधीच कुणी देऊ शकणार नाही”.

Tags: harshada khanvilkarharshada khanvilkar emotionalmarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
arbaaz khan and sshura khan daughter name

अरबाझ खान व शुरा खानने ठेवलं लेकीचं हटके नाव, अर्थ आहे फारच वेगळा, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.