सोशल मीडियाचं क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. आजच्या काळातील हे प्रभावी माध्यम जितकं फायदेशीर तितकंच घातक. कित्येकदा आपणच याचा वापर करताना लक्षात येतं. रील्सच्या माध्यमातून तर जगभरात पोहोचणारी अनेक मंडळी आहेत. पण हीच रील जर जीवघेणी ठरत असेल तर… अलिकडे एखादी रील शूट करत असताना लोकांना भानच राहत नाही. आजूबाजूला नक्की कोणत्या गोष्टी घडत आहेत याच्याकडे लक्ष नसतं. रील्सच्या नादात पाणी, आग याच्याशीही जीवाचा खेळ करतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एका चिमुकलीने आपल्या डोळ्यांदेखत आईचा मृत्यू पाहिला. यादरम्यानचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (woman drowns in river uttarkashi)
रील शूट करताना महिलेचा मृत्यू
उत्तराखंड येथील उत्तरकाशीच्या मणिकर्णिका घाट येथे महिलेचा मृत्यू झाला असल्याची बातमी वेगाने पसरली. ही महिला आपल्या कुटुंबासह फिरायला आली होती. मुळचं नेपाळचं हे कुटुंब. उत्तराखंडची सफर करत असताना कुटुंब अगदी मजेत होतं. मात्र काळा काळ वेगाने आला. भागीरथी नदीच्या किनारी रील शूट करण्यासाठी ही महिला पाण्यात उतरली. तिच्याच कुटुंबातील सदस्य महिलेचं रील शूट करत होते. रील शूट करत असताना त्या महिलेची मुलगीही तिथे होती.
आणखी वाचा – जया बच्चन नेहमीच रागात व चिडचिड करतात कारण…; गंभीर आजारामुळे आहे हा सगळा त्रास, नक्की काय झालंय?
काही सेकंदांचा थरारक व्हिडीओ
आईची रील शूट करत असताना लेकही खूप खूश होती. महिला नदीच्या किनारी पाण्यात उतरली. मात्र पाण्याचा प्रवाह अधिक होता. त्या महिलेला त्याचंही भान उरलं नाही. कॅमेऱ्यासमोर ती पोझ देत राहिली. पाण्यात उतरताच तिचा तोल गेला. पाणी वाहतं असल्यामुळे तिला तिचा तोलही सावरता आला नाही. वाहत्या पाण्याच्या वेगात महिला वाहून गेली. डोळ्यांदेखत आई नदीत बुडत आहे हे पाहून लेकीला काय करावं हेही सुचेना.
पानी का तेज बहाव था, लेकिन फिर भी रील के लिए रियल लाइफ दांव पर लगा दी।
— Gems of Himachal (@GemsHimachal) April 16, 2025
रील बनवाते हुए भागीरथी में बह गई नेपाली मूल की महिला, उत्तरकाशी घूमने आई हुई थी महिला।।#bhagirathi #uttarkashi pic.twitter.com/pnozYeJjrK
आणखी वाचा – गाडीचा टायर काळ्याच रंगाचा का असतो?, यामागचं कारण नक्की काय?
व्हायरल व्हिडीओमध्ये “मम्मी मम्मी…” म्हणत ही मुलगी ओरडताना दिसत आहे. महिला नदीत वाहून गेल्यानंतर तेथील प्रशासनाने तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनीही बरेच प्रयत्न केले. मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे अजूनही या महिलेचा मृतदेह मिळाला नसल्याचं बोललं जात आहे. फक्त एका रीलसाठी आणि काही क्षणभरांच्या लाइक्ससाठी महिलेने तिचा जीव गमावला. त्याहीपेक्षी एका लहानग्या मुलीने आपल्या आईला कायमचं गमावलं आहे.