स्टार प्रवाह वाहिनी ही कायमच प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत असते. या वाहिनीवरील मालिका प्रेक्षक आवडीने पाहतात, टीआरपीच्या शर्यतीत ही वाहिनी अव्वल स्थानावर आहे. या वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, ‘सहकुटुंब सहपरिवार’, ‘रंग माझा वेगळा’, ‘अबोली’, ‘तुझेच मी गीत गात आहे’, ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. अशातच एका नव्या मालिकेच्या प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (star pravah serials update)
‘प्रेमाची गोष्ट’ ही नवी मालिका लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु होणार असल्याचं समोर आलं आहे. या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळे दिसणार आहेत. तेजश्रीने तब्बल दोन वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. तेजश्रीच्या मालिकेची प्रेक्षकही आतुरतेने वाट पाहत होते. आता स्टार प्रवाह वर सुरु होणाऱ्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेची वेळ रात्री ८ वाजता असल्याचं समोर आलं आहे.
पाहा ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? (star pravah serials update)
सध्या तरी रात्री ८ वाजता ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका सुरु आहे, यावरूनच असा अंदाज वर्तवण्यात येत आहे की, ‘रंग माझा वेगळा’ मालिका संपून त्या जागी ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका येणार. की आणखी कोणत्या मालिकेची वेळ बदलून दुसरी कोणती मालिका निरोप घेणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
हे देखील वाचा – हिंदी मालिकेचा रिमेक.?का होतोय तेजश्रीच्या नव्या मालिकेचा प्रोमो ट्रोल
‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सुरु होताना नेमकी कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. तर नेमकी कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
