शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तू याच्यामध्ये असं काय पाहिलंस?”, शाहरुख खानने जेव्हा सानिया मिर्झाला शोएब मलिकबाबत विचारलेला प्रश्न, म्हणालेली, “तो खूप…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 23, 2024 | 6:04 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Sania Mirza and Shoaib Malik Divorce

"तू याच्यामध्ये असं काय पाहिलंस?", शाहरुख खानने जेव्हा सानिया मिर्झाला शोएब मलिकबाबत विचारलेला प्रश्न, म्हणालेली, "तो खूप..."

टेनिसपटू सानिया मिर्झापासून घटस्फोट घेतल्यानंतर माजी क्रिकेटपटू शोएब मलिक याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसह तिसरे लग्न केले आहे. या जोडप्याने २० जानेवारी रोजी सोशल मीडियावर त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो शेअर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. दरम्यान, आता बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुखचा व्हिडीओ समोर आला आहे. शाहरुखच्या या व्हिडीओमध्ये सानिया व शोएब दिसत आहेत. (Sania Mirza and Shoaib Malik Divorce)

समोर आलेल्या व्हिडीओत शाहरुखने सानियाला असा काही प्रश्न विचारला ज्यामुळे तो व्हिडीओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ कोणत्या एका इव्हेंट किंवा अवॉर्ड शोचा असल्याचं कळतंय. शाहरुखने सानियाला विचारले की, शोएबमध्ये तिने असे काय पाहिले ज्यामुळे तिचे त्याच्याशी लग्न केले. आता या प्रश्नावर सानियाने काय उत्तर दिले हे पाहणं रंजक ठरलं.

आणखी वाचा – Video : …अन् मुस्लिम कुटुंबाने ‘रामायण’मधील श्रीरामांबरोबर सेल्फी काढत घेतलं दर्शन, ‘तो’ व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

शाहरुख शोएबकडे बोट दाखवत सानियाला विचारतो, “खरं सांग, तू याच्यामध्ये असं काय पाहिलं की तू पटकन त्याच्याशी लग्न केलंस. हा देखणा आहे, खेळ देखील ठिकठाक खेळतो. सर्व काही चांगले आहे पण शोएबची अशी कोणती वैयक्तिक गोष्ट जास्त भावली?”, यावर सानियाने उत्तर दिले की, “मी तर खूप काही पाहिले त्यांच्यात, ते खूप लाजाळू आहेत, कसं बोलावं हे तुम्हाला त्यांना शिकवावं लागेल. यावर शाहरुख गमतीत म्हणताना दिसत आहे की, “मी ते करेन. मी जुळवून घेईन”.

View this post on Instagram

A post shared by Naira | Entertainment and Gossips (@bollyeedit)

आणखी वाचा – अंकिता लोखंडेवर तिची जाऊबाईच पडली भारी, ‘बिग बॉस १७’मध्ये आल्यानंतर अभिनेत्रीशी होतेय तुलना कारण…

यानंतर शाहरुख खानने शोएबला विचारले, “तुला सानियात असे काय आवडले की तू तिच्या प्रेमात पडलास?” यावर उत्तर देताना शोएब म्हणताना दिसत आहे की, “मला हा विचार करायला वेळ मिळण्यापूर्वीच लग्न झाले होते”. सानिया मिर्झा व शोएब मलिक यांनी २०१० मध्ये लग्न केले होते. लग्नाच्या ८ वर्षानंतर सानियाने इझानला जन्म दिला. दरम्यान, शोएब व सानिया यांचा घटस्फोट झाल्यानंतर दोघांनी त्यांच्या मुलाचा सांभाळ एकत्र करण्याचं ठरवलं असल्याचं समोर आलं आहे.

Tags: entertainmentSania MirzaSania Mirza and Shoaib Malik Divorcesania mirza divorceshoaib malik marriageshoaib malik sania mirza divorce
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Ramayan fame actor arun govil disappointed for he did not get chance to take darshan at ram temple see the details

अयोध्येमध्ये रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठापणासाठी गेलेले 'रामायण'मधील राम नाराज, दर्शनच मिळालं नाही, म्हणाले, “प्रचंड गर्दी अन्...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.