कलाकार म्हणून काम करत असताना पहिल्यांदा माणूस म्हणून त्या व्यक्तीला जगता येणं किती महत्वाचं असत याची अनेक उदाहरणे कित्येक कलाकारांकडे पाहून मिळतात. यातलंच एक उदाहरण द्यायचं म्हणजे मराठीतला कॉमेडीचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे. लक्ष्मीकांत बेर्डे यांना संपूर्ण सिनेसृष्टीत लक्ष्या या नावानेच ओळखलं जात. लक्ष्याने आजवर मराठी सोबत बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची जादू दाखवली. (Lakshmikant Berde)
बॉलिवूडमधील हिट सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारून रसिक प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. मराठी इंडस्ट्रीतला हा बादशाह जेव्हा बॉलिवूडमध्ये जातो तेव्हा तिथले कलाकार त्याला घाबरून असायचे याबाबतचा एक किस्सा लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितला आहे, चला तर जाणून घेऊया काय आहे तो किस्सा आजच्या जपलं ते आपलं या भागात.
पाहा का धरला होता सलमानने लक्ष्मीकांत सोबत अबोला (Lakshmikant Berde)
माझ्या नशिबाने मी मराठीतला नायक असल्यामुळे आणि मराठी इंडस्ट्रीत माझं चांगलं नाव असल्यामुळे लोक मला घाबरून असतात. ‘मैने प्यार किया’ मधला एक किस्सा सांगत लक्ष्मीकांत बेर्डे म्हणाले की, सलमानला कोणीतरी सांगितलं होत की, लक्ष्मीकांत बेर्डे पासून सावध राहा. आयत्यावेळी सीन दरम्यान तो एडिशन करतो. सुरुवाती सुरुवातीला तो माझ्याशी बोलायचाच नाही, चांगला पोरगा आहे, सगळ्या युनिटबरोबर असतो. मग मीच एकेदिवशी त्याला विचारलं जोपर्यंत आपलं ट्युनिंग होत नाही तोपर्यंत आपले सीन चांगले होणार नाहीत. (Salman Khan)
ट्युनिंग होणं महत्वाचं आहे. भाग्यश्री या चित्रपटात होती, महाराष्ट्रीयन असल्याने आणि माझी फॅन असल्याने तीच आणि माझं चांगलं जमत होत. पण सलमान सोबत जुळवायला मला थोडे दिवस लागले. आणि नंतर तो खुलत गेला. आणि त्याला कळलं की कोणत्याही एका सीनसाठी ट्युनिंग महत्वाचं असत. एका सीन मध्ये दिग्दर्शकाला मी स्वतःच सांगितलं की, दोघांचा सीन आहे, मला अव्हॉइड कर नाहीतर लोक माझ्याकडेच बघतील.
भीती वाटणं वा दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून एखाद्या व्यक्तीची, एखाद्या कलाकारांची प्रतिमा तयार करणं हे चूक आहे, त्यामुळे एकत्र काम करताना येणाऱ्या अडचणी वाढत जातात याच विश्लेषण लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मैने प्यार किया चित्रपटादरम्यान सलमान खानला समजावून सांगितले.