Shreyas Talpade Health Update : अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली. या बातमीमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये काळजीच वातावरण पसरलं. अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचंही समोर आलं. यानंतर आता त्याच्या तब्येतीबाबतची अपडेट समोर आली आहे. वेलकम टू जंगल चित्रपटाचं शूटिंग करण्यादरम्यान ही घटना घडली असल्याचं समोर आलं. मात्र आता त्याच्या तब्येतीबाबत डॉक्टरांकडून व त्याच्या जवळच्या कुटुंबियांकडून अपडेट समोर आली आहे.
श्रेयस तळपदे वेलकम टू जंगल चित्रपटाचं शूटिंग करण्यात व्यस्त होता. त्याने गुरुवारी या चित्रपटातील काही ऍक्शन सीन शूट केले. गुरुवारी तो संपूर्ण दिवसभर शूटिंग करत होता. शूटिंगदरम्यान त्याची प्रकृती उत्तम होती. मात्र शुटिंगनंतर त्याच्या प्रकृतीत बिघाड झाल्याचं समोर आलं. शूटिंग संपल्यानंतर श्रेयस घरी आला तेव्हा त्याला अस्वस्थ वाटत होतं. ही गोष्ट त्याने त्याच्या पत्नीला सांगितली. त्यानंतर तात्काळ त्याच्या पत्नीने त्याला रुग्णालयात दाखल केलं.
आणखी वाचा – श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका?, रुग्णालयात दाखल, आता कशी आहे प्रकृती?
रुग्णालयात जाताना त्याला वाटेतच चक्कर आल्याचंही समोर आलं. रात्री १० वाजताच्या सुमारास त्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली. आता त्याच्या तब्येतीत सुधारणा होत असून लवकरच त्याची घरी सोडण्यात येणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तसेच श्रेयाच्या जवळच्या कुटुंबियांकडून समोर आलेल्या माहितीनुसार, श्रेयसची तब्येत आता बरी असून त्याच्यावरील मोठा धोका टळला आहे. त्याच्या तब्येतीत आता सुधारणा होत असल्याचेही कळत आहे. तरीही त्याला विश्रांतीसाठी आणखी दोन दिवस रुग्णालयात ठेवणार असल्याचं समोर आलं आहे.
रुग्णलयातील तपासणीदरम्यान असं समोर आलं की, अभिनेत्याच्या हृदयात ब्लॉक असल्याचं आढळलं. त्यानंतर लगेचच अँजिओप्लास्टी करण्यात आली. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीच ही अँजिओप्लास्टी केल्याने मोठा धोका टळल्याचं ही समोर आलं आहे. सध्या अभिनेत्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. तसेच त्याच्या प्रकृतीतही सुधारणा असल्याचं समोर आलं.