दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाईल्स’ नंतर प्रेक्षक ज्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. तो बहुप्रतीक्षित ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपट काल देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाकडून प्रेक्षकांना अपेक्षा होती. मात्र, ती अपेक्षा खरी उतरण्यास विवेक अग्निहोत्रींना अपयश आल्याचे चित्र दिसत आहे. कारण, चित्रपटाचा दोन दिवसाचे आकडे नुकतेच समोर आले असून या आकड्यांनुसार प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवल्याचे चित्र सध्या दिसत आहे. (The Vaccine War Box Office Collection)
कोरोना काळात देशात उद्भवलेली स्थिती आणि त्यानंतर कोरोना प्रतिबंधक लस बनवणाऱ्या संशोधकांच्या प्रवासावर ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपट आधारित आहे. चित्रपटात नाना पाटेकर, पल्लवी जोशी, अनुपम खेर, गिरीजा ओक, सप्तमी गौडा, रायमा सेन या कलाकारांनी महत्वाची भूमिका साकारली. अशातच विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित चित्रपटाचा पहिल्या दिवसाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आला आहे.
हे देखील पाहा – “ती व तिची आई माझ्याजवळ रडत होत्या आणि…”, ‘गदर’च्या दिग्दर्शकाचा प्रियांका चोप्राबाबत मोठा खुलासा, “नाकाची सर्जरी झाली अन्…”
सैकनिल्कच्या ट्रेंड रिपोर्टनुसार ‘द व्हॅक्सिन वॉर’ने पहिल्या दिवशी ८५ लाखांची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी अवघ्या ६० लाखांची कमाई केली असून दोन दिवसात केवळ १.४५ कोटींची कमाई चित्रपटाने केली. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर टिकणार का? असा प्रश्न पडला आहे. देशभरातील एक हजार स्क्रीनवर ‘द वैक्सीन वॉर’ प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट हिंदीसह मराठी, बंगाली, कन्नड, तमिळ यांसारख्या अन्य भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
हे देखील पाहा – मुग्धा वैशंपायनची होणाऱ्या नवऱ्यासाठी वाढदिवसानिमित्त खास पोस्ट, गोव्यातील रोमँटिक फोटो शेअर करत म्हणाली, “माय मॅन…”
दरम्यान, विवेक अग्निहोत्रींच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’बरोबर ‘फुकरे ३’ आणि ‘चंद्रमुखी २’ चित्रपटदेखील प्रदर्शित झाले आहे. त्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी ‘द वैक्सीन वॉर’पेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कितपत यशस्वी होईल? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.