Virat Kohli Test Retirement : सगळ्यात चर्चेत असणारा भारताचा क्रिकेटपटू विराट कोहलीने आज मोठी घोषणा केली. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं त्याने जाहिर केलं. सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करत विराटने याबाबत माहिती दिली. तब्बल १४ वर्ष कसोटी क्रिकेट खेळल्यानंतर हा मोठा निर्णय त्याने घेतला. या १४ वर्षांमध्ये त्याने जवळपास १२३ मॅच खेळल्या. करिअरमधील ही महत्त्वपूर्ण कारकिर्द इथेच थांबवण्याचा विराटचा निर्णय ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. सगळ्या स्थरामधून त्याच्या या निर्णयावर चर्चा होत आहे. तर बऱ्याच क्रिकेटप्रेमींनी दुःखही व्यक्त केलं आहे. याचबाबत आता विराटची पत्नी व अभिनेत्री अनुष्का शर्माने प्रतिक्रिया दिली आहे. (Anushka sharma on virat kohli retirement)
अनुष्का शर्माची पहिली प्रतिक्रिया
अनुष्काने सोशल मीडियाद्वारे विराटसाठी भावुक पोस्ट शेअर केली. यावेळी तिने विराटचं कौतुक केलं. तसेच मोजक्याच शब्दांत अनुष्काने त्याच्या कारकिर्दीबाबत सांगितलं. अनुष्का म्हणाली, “तुझे रेकॉर्ड्स, माइलस्टोन याबाबत सगळेचजण बोलतील. चर्चा करतील. पण तुझे अश्रू जे कोणी पाहिले नाही, तुझा तो संघर्ष जो कोणालाही माहित नाही आणि तुझं खेळाप्रती असणारं अतुट प्रेम कायमच माझ्या आठवणीत राहील”.
आणखी वाचा – वडिलांचा शेवटचा फोन, सुरक्षित आहे बोलले अन्…; शहीद सुरेंद्र मोगा यांच्या लेकीचा आक्रोश, म्हणाली, “बदला घेईन”
अनुष्का शर्माची पोस्ट काय?
“प्रत्येक कसोटी मालिकेनंतर तुझ्यात थोडेफार बदल होत गेले, तू शांत, नम्र झालास. तुला या सगळ्या चढ-उतारांमधून जाताना पाहिलं हे माझं भाग्यच आहे. पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये कसोटी सामन्यांमधून तू निवृत्ती घेशील असाच मी नेहमी विचार केला होता. पण नेहमीच तू तुझ्या मनाचं ऐकलं आहेस. ‘माय लव्ह’ मी एवढंच सांगेन की, निवृत्ती घेण्यापर्यंतचा प्रत्येक क्षण तू कमावला आहेस”. अगदी भावुक शब्दांमध्ये अनुष्का व्यक्त झाली.
आणखी वाचा – अवघ्या तिशीत सुप्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, मित्राच्या मेहंदीमध्ये नाचला, मित्रांसह मस्करी केली अन्…
अनुष्काच्या या पोस्टनंतर अनेकांनी कमेंट करत विराटचं कौतुक केलं. क्रिकेट किंग खूप छान खेळल्याबद्दल आभारी आहोत, आम्ही तुझे खूप मोठे चाहते आहोत, तुझे चाहते आज रडत आहेत ते विसरु नकोस, विराट नको ना निवृत्ती घेऊ अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. विराटने आजवर १२३ कसोटी सामने खेळले. यामध्ये त्याने नऊ हजार २३० धावा केल्या. १० हजार धावा पूर्ण करण्यापूर्वीच विराटने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.